Monday, April 29, 2024
Homeनाशिकनाशकातील सात पुलांवर नो पार्किंग झोन

नाशकातील सात पुलांवर नो पार्किंग झोन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ( Discharge of water from Gangapur Dam ) केला जात असल्याने गोदावरी नदीवर असलेल्या तब्बल सात पुलांवर ( Bridges on Godavari River ) व त्याच्या आजूबाजूच्या शंभर मीटर परिसरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नो पार्किंग झोन ( No Parking Zone )करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मुसळधार पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून दररोज दहा हजार क्युसेस पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा पूर बघण्याकरता नागरिक मोठ्या संख्येने शहरातील पुलांवर आपली वाहने पार्क करून पूर बघण्यासाठी गर्दी करत असल्याने या ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे.

त्याठिकाणची वाहतूक सुरळीत राहण्याकरिता नाशिक शहरातील अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी, गाडगे महाराज पूल पंचवटी, रामवाडी पूल पंचवटी, कन्नमवार पूल पंचवटी, बापू पूल गंगापूर, दसक फुल उपनगर व चेहडी पुल नाशिकरोड या ठिकाणी पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूस शंभर मीटर अंतरावर पुढील आदेश येईपर्यंत नो पार्किंग झोन करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naikanavare)यांनी दिले आहेत.

तरी नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या