Friday, April 26, 2024
Homeनगरनो मास्क, नो रेशन

नो मास्क, नो रेशन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात करोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता विना मास्क आपण जर स्वस्त धान्य दुकानात

- Advertisement -

रेशन घेण्यासाठी गेला तर आपल्याला रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. नो मास्क नो रेशन असा निर्णय जिल्हा धान्य दुकानदार संघटनेने घेतला आहे.

सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत असून स्वस्त धान्य दुकान चालकही करोनाच्या विळख्यात सापडलेला आहे अनेक दुकानदारांना करोनाची बाधा झालेली आहे संगमनेर, राहुरी, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा या तालुक्यातील दुकानदारांना करोनाची बाधा झाली आहे.

अनेक जण त्यातून सुखरुप घरी परतले आहेत तर काही दुकानदारांवर अजुनही उपचार सुरुच आहेत. काहींना तर वेळेवर बेड पण मिळाले नाही रेशन दुकानातून धान्याचे वाटप करत असताना येणार्‍या प्रत्येक कार्डधारकाचा अंगठा हातात धरूनच पाँज मशिनवर ठेवावा लागतो त्या नंतरच तो अंगठा जुळतो हे करत असताना कोण व्यक्ती कशी असेल ते ही सांगता येत नाही दुकानदाराने जरी काळजी घेतली तरी एखादा बाधित रुग्ण आल्यास संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. रेशन खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकाने देखील आपली व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे.

या संकट काळात सर्वजण घरीच बसलेले असताना धान्य दुकानदार हा जीव मुठीत धरून धान्याचे वाटप करत होता हे करत असताना राज्यातील 35 दुकानदारांना आपला जीव गमवावा लागला आहे आता प्रत्येकाला आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करुनच सर्व कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने मास्क घालूनच घराबाहेर पडावे. आता रेशनचे धान्य खरेदी करिता येणार्‍या ग्राहकांसाठी मास्क सक्तीचे केले जाणार आहे.

आता यापुढे नो मास्क नो रेशन ही संकल्पना सर्व दुकानदार राबविणार असून रेशनचे धान्य खरेदीसाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने मास्क घालूनच धान्य घेण्यासाठी यावे असे आवाहनही अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, विश्वासराव जाधव, बाळासाहेब दिघे, सुरेशराव उभेदळ, ज्ञानेश्वर वहाडणे, गणपतराव भांगरे, गजानन खाडे, कैलास बोरावके, बजरंंग दरंदले, माणिक जाधव, बाबा कराड, रावसाहेब भगत, बाबासाहेब ढाकणे, मोहिते पाटील आदींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या