Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हा न्यायालयात नो मास्क नो एंन्ट्री; वकिल वर्गात पसरली काळजी

जिल्हा न्यायालयात नो मास्क नो एंन्ट्री; वकिल वर्गात पसरली काळजी

नाशिक।Nashik (प्रतिनिधी)

तब्बल दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सुरू झालेल्या न्यायालयाच्या कामकाजाला वाढत्या करोनामुळे पुन्हा खो बसण्याच्या भितीने वकिल वर्गामध्ये काळजी पसरली आहे. तशी वेळ परत येऊ नये याची खबरदारी म्हणून न्यायालयात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ करत करोना नियमाची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

देशभरात करोना संसर्ग वाढल्यानंतर उच्च न्यायालयाने मार्च 2020 च्या अखेरीस न्यायालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन काळात फक्त फौजदारी गुन्ह्यांमध्ये जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज अशा अत्यावश्यक प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. काही महिन्यांच्या अंतराने ऑनालईन पद्धतीने सुनावणी वाढवण्यात आल्या. मात्र, त्याचा फार फायदा झाला नाही. यामुळे जिल्ह्याभरातील हजारो वकीलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. लाखो पक्षकारांनाही न्याय मिळण्याची प्रतिक्षा आणखी वाढली. करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यभरात सर्व व्यवहार सुरळीत झाले.

मात्र 1 फेब्रुवारीपासून न्यायालयाचे कामकाज पुर्ववत सुरू झाले होते. तर अवघ्या 22 दिवसात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, स्वच्छता, विनाकारण गर्दी न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशानुसार न्यायालयात खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

हे आहेत नियम

* न्यायालयीन परिसरात येणार्‍या प्रत्येकास मास्क बंधनकारक

* कोरोनाची लक्षणे असणार्‍या संशयितांना न्यायालयात प्रवेश नाही

* पासधारक वाहनांनाच न्यायालयीन परिसरात प्रवेश

* पक्षकारांना कामाशिवाय इतर वेळ न थांबण्याचेही आदेश

* बाररुम, चेंबर्स येथे सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायजरचा वापर बंधनकारक

* नियम न पाळणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

सरकारी वकिल पॉझिटिव्ह

काही दिवसांपुर्वीच जिल्हा न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांना कोरोनाची लागन झाल्याने वकिल वकिलांमध्ये चिंता पसरली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन अधिक काळजी घेतली जात आहे. विनामास्क न्यायालयीन परिसरात फिरणार्‍यांवर 300 रुपयांचा दंड तसेच थुंकणार्‍यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या