Thursday, April 25, 2024
Homeजळगावनो-मास्क, नो-एन्ट्री 105 नागरिकांना दंड

नो-मास्क, नो-एन्ट्री 105 नागरिकांना दंड

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मास्क न वापरणार्‍यांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चौकाचौकांसह बसस्थानक आणि खासगी क्लासेसमध्ये जावून पाहणी केली. दरम्यान शनिवारी 105 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्यामुळे प्रशासनातर्फे वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेतर्फे विनामास्क नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी मनपा प्रशासनाने वाहतूक पोलीस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उपायुक्त संतोष वाहुळे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली मास्क न वापरणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.

बसचालक-वाहकांवर कारवाई

शहरातील काही चौकांमध्ये कारवाई केल्यानंतर उपायुक्त वाहुळे यांच्यासह पथकाने बसस्थानकात आपला मोर्चा वळवला. बसस्थानकात विनामास्क प्रवाशांवर कारवाई केल्यानंतर बसमध्ये चढून त्यांनी पाहणी केली. दरम्यान काही बस चालक व वाहकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या मोहीमेत लिपिक संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, शेखर ठाकूर, भानुदास ठाकरे, दिलीप कोळी, राजू वाघ, इकबाल बागवान, किशोर सोनवणे, राजू गोंधळी यांचा समावेश होता.

क्लासेसच्या संचालकांवर कारवाईचा बडगा

शहरातील काही खासगी क्लासेसमध्ये जावून उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी केली. त्यात एका क्लासमध्ये तब्बल 19 विद्यार्थी तर एका क्लासमध्ये चार विद्यार्थी विनामास्कने आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई न करता थेट संचालकांवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या