Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशकात आजपासून 'नो हेल्मेट नो पेट्रोल'

नाशकात आजपासून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’

नाशिक | Nashik

अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांण्डे्य (Police Commissioner Dipak Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस (Nashik City Police) आजपासून शहरात ‘नो हेल्मेट – नो पेट्रोल’ (No Helmet No Petrol) उपक्रम राबवणार आहेत.

- Advertisement -

या उपक्रमाचे पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते गंगापूर रोडवरील (Gangapur Road) सद्भावना पेट्रोल पंपावर (Sadbhavna Petrol Pump) उद्घाटन होणार आहे.

अपघाती मृतांची संख्या कमी करण्यासाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाते. मात्र बेशिस्तांकडून हेल्मेटचा वापर होत नसल्याने मृत्यूचा धाेका कायम असतो.

यामुळे पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या संकल्पनेतून नो हेल्मेट नो पेट्रोल हा उपक्रम पुढे आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संमतीने हा उपक्रम शहर पोलिसांनी हाती घेतला असून त्याचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनी केला जाणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल मिळणार आहे.

हेल्मेटचा वापर करावा : पालकमंत्री भुजबळ

पोलीस विभागाने स्वातंत्र्यदिनापासून नो हेल्मेट नो पेट्रोल उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्त्युत असून आजच्या घडीला प्रत्येक जीव महत्वाचा आहे. प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा. गेल्या पाच वर्षात शहरात ७८२ अपघातात ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाले. मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोेर आले आहे.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

पंपांवर लागले बॅनर

शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर बॅनर लावण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या