Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनिधीच नाही; शाळांमध्ये सीसीटीव्ही कसा बसवणार: शिक्षण विभाग

निधीच नाही; शाळांमध्ये सीसीटीव्ही कसा बसवणार: शिक्षण विभाग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्याच्या तत्कालिन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Former Education Minister Varsha Gaikwad) यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये (school) सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवण्याचे आदेश चार महिन्यांपूर्वी दिलेले आहेत.

- Advertisement -

त्यानुसार शिक्षण विभागाने (Department of Education) मागविलेल्या अहवालानुसार शाळांना सीसीटीव्ही (CCTV for schools) बसवण्यासाठी पुरेसा निधीच (fund) मिळत नसल्याचे शिक्षण विभागाला कळवले आहे. त्यामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे काय होणार असा मुद्दा उपस्थित होत आहे.

पुण्यातील (pune) एका शाळेत 11 वर्षांच्या मुलीवर स्वच्छतागृहात बलात्कार (Girl raped in toilet) झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते. नाशिक जिल्ह्यात (nashik district) जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) 3 हजार 263 प्राथमिक शाळा (Primary school) आहेत. तर खासगी प्राथमिक शाळांची संख्या 663 इतकी आहे. या सर्व शाळांकडून सीसीटीव्ही बसवण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने अहवाल मागविला होता.

त्यात शाळांनी सीसीटीव्ही (CCTV) बसवण्यास निधीच उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. तसेच सीसीटीव्ही बसवल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीचा खर्च कोण सांभाळणार असाही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील (rural area) जिल्हा परिषद (zilha parishad) व खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांपुढे सीसीटीव्ही बसवण्याचा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मार्च 2022 मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता शिंदे-फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारचे निर्णय रद्द करत असल्याने या निर्णयाचे काय होणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हे होते शाळांना आदेश?

वर्षभरात खासगी शिक्षण संस्थासह सर्व शासकीय शाळांमध्ये जिल्हा नियोजन समितीसह स्थानिक स्वराज्य संस्था, सीएसआर, लोकसहभागातून निधी उभारून सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश माजी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले होते. राज्यात एकूण 65 हजार शाळांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी राज्यात साधारणत: दोन हजार शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचा प्राथमिक अहवाल तत्कालिन राज्य सरकारकडे प्राप्त झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या