Friday, April 26, 2024
Homeनाशिकमेनराेडला उडाला गाेंधळ; लाॅकडाऊनची भीती, नियम पायदळी; खरेदीसाठी गर्दी

मेनराेडला उडाला गाेंधळ; लाॅकडाऊनची भीती, नियम पायदळी; खरेदीसाठी गर्दी

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

शहर, जिल्ह्यात कराेना रुग्णसंख्या वाढत असल्याने दि. ५ मार्चच्या रात्रीपासून कडक निर्बंध लागू हाेतील, लाॅकडाऊनच लागेल, या शक्यतेने नाशिककरांनी साेमवारी (दि. ६) दुपारी मेनराेड, दहीपूल, शालिमार येथे खरेदीसाठी माेठी गर्दी केली.

- Advertisement -

एकाच वेळी झालेल्या गर्दीने साेशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. मात्र, जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध म्हणजेच दि. ६ ते ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजापेठा बंदच ठेवल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच एक प्रकारे मिनी लाॅकडाऊन असल्याचे जाहीर केले.

साेमवारी (दि. ६) कडक निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता गृहित धरुन शहरातील महिला आणि नागरिकांनी मेनराेड, गायधनी लेन, सराफ बाजार, मेनराेड, धुमाळ पाॅइंट, दहीपूल, कानडे मारुती लेन, रविवार कारंजा यासह अन्य भागात भाजीपाला, कपडे, किराणा माल, तेल, कांदे, बटाटे खरेदीसाठी ताैबा गर्दी केली.

गावात अचानक गर्दी झाल्याने लागू असलेल्या निर्बंधांची नागरिकांकडून पायमल्ली झाली. दरम्यान लाॅकडाऊन लावला जाण्याच्या शक्यतेने काही परप्रांतीय मजूर बस, रेल्वेने आपल्या राज्यात रवाना हाेण्यासाठी गर्दी करताना दिसून आले.

शहरातील बसस्थानकांवर परजिल्हा, परराज्यात जाण्यासाठी रात्रीपर्यंत प्रवाशांची माेठी गर्दी पाहायला मिळाली. यात परप्रांतीय कामगारांचा भरणा जादा हाेता. तसेच नाशिकराेड रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली हाेती.

बॅरेकेडींग हटविले

गेल्या दाेन दिवसांपूर्वी शहर पाेलीसांनी मेनराेडसह गर्दीच्या ठिकाणी विशेष बॅरिकेडींग केली हाेती. यात आधी टाेकन घेतल़्यावरच बाजारात प्रवेश दिला जाणार हाेता. तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांना टाेकन देण्यासाठी चेकनाके तयार केले हाेते.,

मात्र दाेन दिवस हाेत नाही ताेच उभारलेले हे बॅरिकेडींग काही ठिकाणाहून काढण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे अनेक वाहनधारकांना बराच वळसा घेऊन मार्गस्थ व्हावे लागले.

सर्वच गाेंधळ

लाॅकडाऊन लागेल, सर्वच दुकाने बंद राहतील, खरेदी करता येणार नाही, अशी चर्चा साेमवारी दिवसभर हाेती. यामुळे सर्वांना धास्ती हाेती. यामुळेच खरी गर्दी वाढली. या गर्दीत सर्वांकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.

कुणीही मास्क लावलेला नव्हता, साेशल डिस्टन्स पाळल्याचा प्रकार पाहायला मिळाला नाही. जाे ताे आपापल्या परीने बेधडक खरेदीचा, पेटपूजा करण्याचा आनंद लुटताना दिसले. पाेलीस दल, मनपाचे पथक सर्वांच्या नजरेआड असल्याचे दिसले.

वाहनधारकांची गर्दी

लाॅकडाऊन केला जाईल या भितीने गर्दी उसळल्याने वाहनचालकांची माेठी गर्दी झाली हाेती. हाॅर्नचा कर्णकर्कश आवाजाने रस्त्याने जाणारी मंडळी थिबकत हाेती. तब्बल दीड ते दाेन तासांनी वाहतुक पूर्ववत झाली.

– बॅरेकेडींगमुळे नाहक मनस्ताप

– गाडगे महाराज पुतळ्याजवळील भागात नियमांचे उल्लंघन

– एकही मनपा अधिकारी, कर्मचारी बाजारपेठेत नाही

– अचनाक वाढलेली गर्दी अनियंत्रित

– वाहनधारकांच्या रांगा

– विविध दुकानांत साेशल डिस्टन्सचे तीन तेरा

– रविवार कारंजा गर्दीचा हाॅटस्पाॅट

– मनपाकजून काेणतीही कारवाई नाही

– काही ठिकाणी वादाचे प्रकार

– रात्री आठ वाजता पाेलीसांकडून नागरिकांना, व्यावसायिकांना कडक सूचना

- Advertisment -

ताज्या बातम्या