Friday, April 26, 2024
HomeधुळेVideo थेट जनतेतून निवडून आलेल्या फागणे येथील सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

Video थेट जनतेतून निवडून आलेल्या फागणे येथील सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

धुळे । प्रतिनिधी Dhule

ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम करणाऱ्या धुळे तालुक्यातील फागणे येथील सरपंच गोकुळ चंदनमल सिंघवी यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी घेतलेल्या बैठकीत 15 विरुद्ध एक असा अविश्वासदर्शक ठराव पारित झाला होता.

- Advertisement -

त्यानुषंगाने आज धुळे तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी फागणे ग्रामपंचायतीचा कामकाज पाहत एकूण 17 सदस्यांपैकी 15 सदस्यांचा अविश्वास ठरावाला पाठिंबा असल्याने व 2 सदस्य गैरहजर असल्याने पंधरा सदस्यांचा बाजूने निकाल जाहीर करत सरपंच गोकुळ चंदनमल शिंगवी यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर केला.

फागणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीमती मंगला भास्कर पाटील यांनी आपल्या 13 ग्रामपंचायत सदस्यांसह लोकनियुक्त सरपंच गोकुळ चंदनमल सिंगवी यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिनांक 28 /06/2021 रोजी दाखल करण्यात आला होता

त्या अनुषंगाने आज विशेष महासभा बोलून धुळे तहसीलदार गायत्री सैंदाणे या अर्जावरून कामकाज पाहत एकूण 17 ग्रामपंचायत सदस्यपैकी 15 सदस्यांच्या पाठिंबाने 2 ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने सदर सरपंच गोकुळ चंदनमल शिंगवी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.

सदर तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी तालुका पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विशेष कामकाज पाहिले. सरपंच गोकुळ शिंगवी कधीही ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कुठलीही शासकीय योजनांची माहिती सदस्यांना देत नव्हते तसेच गावाच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष करत असल्याने गावांमध्ये मोठ्या समस्यांचा डोंगर उभा होता ग्रामस्थांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सुटत नसल्याने अनेक ग्रामस्थ सरपंच गोकुळ शिंगवी यांच्यापासून नाराजी व्यक्त करत होते.

सदस्यांच्या वार्डात प्रभागात योग्य रीतीने विकास काम होत नसल्याने शासनाचा निधी योग्य रीतीने खर्च होत नसल्याने सदस्यांना देखील अवमानास्पद वागणूक मिळत होती त्यामुळे ग्रामपंचायतीच्या 13 सदस्य व इतर दोन सदस्यांचा पाठिंबा असे एकूण 15 सदस्यांचा पाठिंबा मुळे सरपंच गोकुळ शिंगवी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता त्या अर्जावर आज कामकाज तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी पाहिले या सदस्यांच्या बाजूने निकाल देत सरपंच गोकुळ शेठ शिंगवी यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव पारित केला आहे…

ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अनेक गंभीर आरोप सरपंच गोकुळ शिंगवी यांच्यावर करण्यात आले आहे.यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच विलास अण्णा चौधरी, यांच्या विशेष नेतृत्वाखाली उपसरपंच मंगला भास्कर पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलास नाना पाटील, विक्रम पाटील, महेश अहिरे, तृप्ती पाटील, लीना सोनार, संगीता अहिरे, युवराज सुरवंशी, भिकन पाटील, अनिल भील, राजेश बडगुजर, वसंत पाटील, उर्मिला पाटील अशा पंधरा ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव पारित केला आहे…

- Advertisment -

ताज्या बातम्या