Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची होतेय मागणी

नाशिकमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची होतेय मागणी

इंदिरानगर | वार्ताहर 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. परंतु असे असताना मनपा कर्मचारी यांना अजूनही बायोमेट्रिक मशीनवर हजेरी करावी लागत आहे. त्यामुळे विषाणू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे त्वरित बायोमेट्रिक हजेरी बंद करून रजिस्टर वर हजेरी घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

- Advertisement -

सध्या सर्वत्र बायोमेट्रिक हजेरी पद्धत अवलंबिली जाते आहे. यात व्यक्तीच्या अंगठ्याचे किंवा हाताच्या एका बोटाचे ठसे घेतले जातात. या माध्यमातूनही हा विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने अनेक कार्यालयांनी आपापल्याकडील बायोमेट्रिक पद्धत काही दिवसांपुरती बंद ठेवली आहे.

तर काहींनी उपाययोजना म्हणून बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे . परंतु मनपा विभागीय कार्यालय यापासून अलिप्त आहेत. त्यांनी अशी कुठलीही व्यवस्था केलेली नाही किंवा यासंदर्भात कुठल्या सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत.

मनपा कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देणे गरजेचे आहे तसेच तात्पुरती बायोमेट्रिक हजेरी बंद करून रजिस्टरवर हजेरी घेण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

बायोमेट्रिक मशीन वर अनेक कर्मचारी अंगठा देत असल्याने या माध्यामातून विषाणू पसरण्याची भीती असते किमान सँनीटायझरचा उपयोग करणे गरजेचे आहे त्यामुळे विषाणू हातावर राहत नाही बायोमेट्रिक मशीन जवळ सँनी टायझर ठेवणे गरजेचे आहे.

डॉ प्रीतम अहिरराव, (एमबीबीएस, एमडी) 

- Advertisment -

ताज्या बातम्या