Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक मनपाकडुन दोन दुकानांवर कारवाई

नाशिक मनपाकडुन दोन दुकानांवर कारवाई

नवीन नाशिक । Nashik

करोणा काळात शासनाने कडक निर्बंध जाहीर केले असुन सुध्दा काही नियम पाळत नाही. मनपा आरोग्य विभागाने नवीन नाशकात वेळेनंतर दुकाने चालु ठेवल्याने दोन दुकानदार व तसेच मास्क न वापरणारे सात जणांवर कारवाई करून एकाच दिवशी सुमारे पंचवीस हजार रुपये दंड वसुल केला.

- Advertisement -

मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.कल्पना कुटे, नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांचे सूचनेनुसार विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे अधिकारी व सेवकांनी करोना विषाणू कोव्हीड १९ प्रतिबंधक उपाय योजनेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.

यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करण्याबाबत ७ जणांवर कारवाई करून.३ हजार पाचशे रुपये, तसेच कोव्हीड १९ अनुषंगाने नियमबाह्य दुकान चालु ठेवल्याबाबत २ दुकानदारां वर कारवाई करून दहा हजार रुपये, वेस्ट बाबत शुल्क आठशे रुपये, कचरा वर्गीकरण न केलेबाबत १ केस तीनशे रुपये तसेच कचरा वर्गीकरण न केलेबाबत संपुर्ण सोसायटीस १ केस ध हजार रुपये, एकूण १२ केसेस २४ हजार ६०० रुपयांची दंडात्मक कारवाई करून दंड वसुल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या