Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमधील पाणीकपातीवर मोठा निर्णय; आयुक्त म्हणाले...

नाशिकमधील पाणीकपातीवर मोठा निर्णय; आयुक्त म्हणाले…

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील पाणीकपात रद्द (Water Cut Cancel by NMC) करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव (Commissioner Kailas Jadhav) यांनी आज दिली. पाणीकपात रद्द केली असेल तरीदेखील नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करावा जेणेकरून भविष्यातील पाणीकपातीसारखे निर्णय घेण्याची वेळ ओढवणार नाही. (Take care about water use)

- Advertisement -

आज याबाबतचा निर्णय आयुक्त जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav) यांनी घेतला. ते म्हणाले की, नाशिकला पाणीरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याही पातळी वाढली आहे. त्यामुळे नाशिकवरील पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे.

गेल्या आठवड्यापासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur WaterShed) संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे धरणसमूहातील अनेक धरणे जवळपास फुल झाली आहेत. परिणामी पाण्याची उपलब्धता चांगली असून दोन आठवड्यांपासून करण्यात आलेली पाणीकपात या आठवड्यापासून रद्द करण्यात येणार आहे.

पाणीकपात रद्द करण्यात आली असली तरीदेखील नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करावा. आगामी काळात पावसाने जर दडी दिली तर पुन्हा धरणांची पाण्याची पातळी घातु शकते परिणामी कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असाही इशारा आयुक्त जाधव यांनी नाशिककरांना दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या