Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक'निवेक टेनिस प्रिमियर लिग' २६ जानेवारीला

‘निवेक टेनिस प्रिमियर लिग’ २६ जानेवारीला

सातपूर | प्रतिनिधी

निवेकच्या वतीने पहिल्यांदा ‘निवेक टेनिस प्रिमियर लिग’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुकांनी निवेक येथे संपर्क साधावा असे आवाहन पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आलेले आहे…

- Advertisement -

निवेक च्या माध्यमातून टेनिस स्पर्धांंच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. स्पर्धेसाठीचे आंतरराष्ट्रीय कोर्ट, तज्ज्ञ प्रशिक्षक यांच्या माध्यमातून निवेकच्या पूढाकारातून पहिल्यांदा ‘निवेक टेनिस प्रिमियर लिग’चे आयोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेसाठी विविध खेळाडूंच्या 8 संघांदरम्यान ‘चॅम्पियनशिप’ साठी सामने रंगणार आहेत. या स्पर्धा 26 जानेवारी रोजी घेतल्या जाणार आहेत. यासाठी प्रवेशिका या 15 जानेवारी पर्यंत दाखल करावयाच्या आहेत. निवड न झालेल्या खेळाडूंची प्रवेश फी परत केली जाणार आहे.

या स्पर्धा ग्रुप मॅचेसच्या माध्यमातून खेळवल्या जाणार आहे. जादा सामने जिंकणार्‍या दोन संघांची निवड केली जाणार आहे. निवेक मधिल क्ले व हार्डकोर अश्या दोनही मैदानावर या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूला खेळणे बंधनकारक ठेंवण्यात आलेले आहे.

नाशिकला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय नियमावलीत खेळवल्या जाणार्‍या या स्पर्धेत मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशिक्षक अजित बच्छाव, अपूर्व रोकडे, श्रीकांत कुमावत यांनी केले आहे.

निवेकने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांसोबतच देश विदेशातील खेळाडूंसोबत स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.यंदा पहिल्यांदा नाशिकच्या खेळाडूंना दर्जेदार स्पर्धा पहाण्याचा व खेळण्याचा आनंद मिळावा यासाठी प्रिमियर लिगचे आयोजन केले आहे.

पंकज खत्री (क्रिडा उपसमिती अध्यक्ष)

- Advertisment -

ताज्या बातम्या