Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअदानींमुळे राज्यावर भारनियमनाचे संकट; उर्जामंत्र्यांचा आरोप

अदानींमुळे राज्यावर भारनियमनाचे संकट; उर्जामंत्र्यांचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

अदानी वीज कंपनीने (Adani Power Company) महावितरणचा (Mahavitaran) वीज पुरवठा (Electricity Supply) बंद केल्याने राज्यावर वीज भारनियमनाचे (Load Shedding) संकट उद्भवल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला. वीज टंचाईमुळे राज्यात १४०० ते १५०० मेगावॉट विजेचे भारनियमन करावे लागणार असून नागरिकांनी ते सहन करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले…..

- Advertisement -

कोळशाचा (Coal) तुटवडा तसेच खुल्या बाजारात वीज (Electricity) उपलब्ध नसल्याने राज्यात वीज भारनियमन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत कोळशाची उपलब्धता, वीज भारनियमन, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वीज पुरवठयाचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अदानी कंपनीने थांबवलेला वीज पुरवठा, कोळशाचा तुटवडा आणि खुल्या बाजारात वीज उपलब्ध नसल्याने राज्यात वीज भारनियमनाची समस्या निर्माण झाली आहे. महावितरणला (Mahavitaran) १ हजार ५०० मेगावॉट वीज मिळाली तर भारनियमन तातडीने बंद करू. मात्र, तूर्त वीज उपलब्ध नसल्याने नागरिकांनी पुढील चार ते पाच दिवस भारनियमन सहन करावे तसेच आपल्या भागातील वीज चोरी रोखावी, असे आवाहन राऊत यांनी केले.

आपण आयात कोळशासाठी कंपन्यांना विनंती केली आहे. मात्र, त्यांना वेळ लागणार आहे. आम्ही आठ हजार मेगावॉट क्षमतेने प्रकल्प सुरु करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती त्यांनी दिली. वसुली, वितरण हानी आणि वीज चोरी असलेल्या भागात भारनियमन सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करावे

वीज भारनियमनावरून आंदोलनाचा इशारा देणार्‍या विरोधी पक्ष भाजपला (BJP) नितीन राऊत (Nitina) यांनी यावेळी सुनावले. वीज भारनियमन एकट्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आहे. केंद्र सरकारचे कोळशाचे नियोजन फसले आहे. शिवाय कोळसा मंत्रालयाला रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य नाही. त्यामुळे भाजपने खुशाल केंद्र सरकारविरोधात (Central Goevernment) आंदोलन (Agitation) करावे, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असताना 2015, 2017 आणि 2018 मध्ये वीज भारनियमन सुरु होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या