Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभारतात लवकरच लाँन्च होणार Nissan Magnite, जाणून घ्या वैशिष्ठे

भारतात लवकरच लाँन्च होणार Nissan Magnite, जाणून घ्या वैशिष्ठे

मुंबई | Mumbai

जपानची वाहन निर्माती कंपनी निसान (Nissan) लवकरच भारतात त्यांची नवी कार Magnite लॉन्च करणार आहे. निसान Magnite ही गाडी लॉन्च करत सब कॉम्पॅक्ट एसयुवी (Sub Compact SUV) सेगमेंट मध्ये एन्ट्री करणार आहे. कंपनी 2 डिसेंबर रोजी निसान मॅग्नाइट लाँन्च करणार आहे.

- Advertisement -

अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेल्या या कारची किंमत आणि इंजिन स्पेक्स संदर्भातील माहिती समोर आली आहे. ही कॉम्पॅक्ट एसयुवी 4 ट्रिम मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ज्यामध्ये XE,XL,XV आणि XV प्रीमियमसह एकूण 8 वेरियंटमध्ये असणार आहे. निसान मॅग्नाइटची किंमत 5.50 लाख रुपये ते 8.15 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

इंजिन आणि पॉवर बद्दल सांगायचे झाल्यास ही एसयुवी एन्ट्री लेव्हल वेरियंट मध्ये नॅचरली एस्पिरेटेड 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसह येऊ शकते. जी 71बीएचपी ची पॉवर आणि 96 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच कार मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह उतरवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त कंपनी यामध्ये 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन सुद्धा देऊ शकते. जो टॉप अॅन्ड वेरियंटमध्ये मिळू शकतो.

या एसयूव्हीचे नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc असेल, 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतके पीक टॉर्क जनरेट करु शकते. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आले आहे.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या