Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहेत प्रतीक दोशी?

अर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहेत प्रतीक दोशी?

दिल्ली | Delhi

जेव्हाजेव्हा लग्न किंवा एखाद्या तत्सम समारंभाचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा थाटामाटात पार पडणारा सोहळा, छानछान वेशभूषेत असणारे नातेवाईक आणि आनंदाचा माहोल असंच वातावरण पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेकांनीच लग्नसोहळ्यांसाठी हजारो, लाखो आणि कोट्यवधींचा खर्च केल्याचंही आपण पाहिलं. पण, सध्या मात्र एका अशा लग्नाची चर्चा सुरु आहे जिथं किमान खर्चात कमाल आनंदाचे क्षण अनुभवल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisement -

नुकत्याच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या घरात कार्य पार पडले आणि तेदेखील अत्यंत साधेपणाने. सध्या याच गोष्टीची देशभरात चर्चा केली जात आहे. गुरूवारी (दि. 8) रोजी सीतारामन यांची लेक परकला वांगमयी हिचा विवाह साधेपणाने केला. बंगळुरू येथील त्यांच्या घरी लग्नाचे विधी पार पडले. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला राजकीय क्षेत्रातील किंवा अन्य कुठलेही व्हीआयपी पाहुणे उपस्थित नव्हते. उडुपी अदामरू मठाच्या संतांनी उपस्थित राहून वधुवरांना आशीर्वाद दिले.

WhatsApp वर सेंट झालेला मेसेज कसा एडिट कराल? जाणून घ्या

अर्थमंत्र्यांची मुलगी परकला वांगमयी मिंट लाउंजच्या बुक्स अँड कल्चर विभागासाठी फीचर रायटर म्हणून काम करते. तर जावई प्रतीक दोशी २०१४ पासून पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करतात. प्रतीक दोशी हे मूळचे गुजरातचे असून ते पंतप्रधान कार्यालयामध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करतात. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा प्रतीक दोशी यांचीही येथे बदली झाली होती.

मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह

२०१९ मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती देण्यात आली होती. प्रतीक दोशी यांनी सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रतीक दोशी यांनी गुजरातच्या सीएमओमध्ये संशोधन सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. पीएमओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक दोशी हे पीएमओच्या रिसर्च आणि स्ट्रॅटेजी विंगचे काम पाहतात. ते कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय नाहीत. प्रतीक दोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूपच खास आहेत. पंतप्रधान मोदी कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्णय घेतात तेव्हा प्रतीक दोशी हे त्यांना सगळी माहिती देऊन निर्णय घेण्यास मदत करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या