Friday, May 10, 2024
Homeनाशिकनिफाड राज्यात सर्वात थंड; नाशिकही गारठले

निफाड राज्यात सर्वात थंड; नाशिकही गारठले

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र गारठा वाढला आहे. आज सकाळी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ अंश सेल्सियस तपमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिक शहरातदेखील तपमानाचा पारा १०.५ अंशांवर स्थिरावला आहे. निफाडमधील आजचे तपमान हे राज्यात सर्वात कमी नोंदवले गेलेले तपमान आहे…

- Advertisement -

उत्तर भारतात जम्मू काश्मिरपासुन उत्तराखंडपर्यत बर्फवृष्टी सुरू झाली असुन यामुळे याभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदाच्या हगामात पहिल्या काही दिवसातच विक्रमी बर्फवृष्टी सुरू आहे.

यामुळे उत्तरेकडुन शितल वारे वाहु लागल्याने याचे परिणाम दिल्लीपासुन मध्य भारतापर्यत जाणवू लागले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाल्यानंतर पुन्हा आज (दि.७) पारा 10.5 अंशापर्यत खाली आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अचानक पारा घसरल्याने गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात असलेली थंडीची स्थिती पाहत यंदा लवकरच थंंडीची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या 12 नोव्हेंबर रोजी राज्यात पारा 12 वरुन 9.5 अंशापर्यत खाली आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यात 10.4 अंश असे किमान तापमान नोंदविले गेले होते.

यानंतर आज राज्यातील पुन्हा एकदा किमान तापमान घसरल्याने नाशिक जिल्ह्यात 10.5 अशा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर आज नाशिक जिल्ह्यातील निफाड 9.5 अंशांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 1 व 2 डिसेंबर रोजी किमान तापमान 16 ते 18 अंशाच्या दरम्यान होते, आज अचानक पारा दोन अंशांनी खाली आल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचे आगमन झाल्याचे दिसुन आले.

गेल्या तीन दिवसात दोन ते अडीच अंशांने पारा घसरल्याने आज ग्रामीण भागात रात्री व पहाटेच्या दरम्यान शेकोटया पेटू लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या