नासाकाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार

पंचवटी | Panchavati

गेल्या सात वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला नासाका (Niphad Sakhar Karkhana) सुरू करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik Krushi Utpanna Bajar Samiti( राज्य शासनाला प्रस्ताव पाठवणार आहे.

शुक्रवार (ता.०९ ) रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत (Online Yearly General Meeting) हा निर्णय घेण्यात आला.

सभापती देविदास पिंगळे (President Devidas Pingale), उपसभापती प्रभाकर मुळाणे (Vice President Prabhakar Mulane), संपतराव सकाळे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्र्वास नागरे, युवराज कोठूळे, भाऊसाहेब खांडबहाले, रवी भोये, शाम गावीत, संजय तुंगार, चंद्रकांत निकम, प्रवीण नागरे, विमलताई जुंद्रे, सचिव अरुण काळे तसेच नासाकाचे संचालक नामदेव गायधनी, लीलाबाई गायधनी, बाबुराव दलवाडे, भाऊसाहेब ढिकले, किरण गायधनी , विलास गायधनी, बापू थेटे, पी जी गुळवे,अनिल मोराडे आदी शेतकरी उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी ही ऑनलाईन सभा सुरू झाली. यात नाशिक जिल्हयातील सभासद (Districts Candidate’s) व शेतकरी (Farmer’s) या सहभाग नोंदविला.

नाशिक साखर कारखाना पूर्ववत सुरू होण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक सक्षम आहे का असा सवाल विकास गायधनी यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देत बाजार समिती सभापती यांनी आज रोजी शेतकरी बांधवांचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. बेरोजगार झालेले कर्मचारी (Unemployment Worker) यांचा प्रश्न सुटणार असल्याने कारखाना सुरू करणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

बापू थेटे यांनी बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर कारखाना सुरू करते आहे ही बाब अभिनंदनीय आहे. आजमितीस इतर जिल्ह्यात ऊस न्यावा लागत आहे. तरी आपण सर्व तोपरी प्रयत्नशील राहून कारखाना सुरू करावा अशी मागणी केली, नामदेव गायधनी यांनी कारखाना सुरू करावा मात्र यात कुठलेही राजकारण आणू नये व शेतकरी हिताचा विचार करण्याची मागणी केली.

यानंतर बाजार समिती व नासाका सभासद यांचे सोबत चर्चा करून संचालक मंडळाने एक मताने निर्णय घेत नाशिक साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवत निवीदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून नासाका आर्थिक बाबी मुळे बंद अवस्थेत होता. नासाका सुरू होणेसाठी ऑनलाईन झालेल्या सभेत शेतकरी व सभासद यांनी मत मांडले. बाजार समिती व साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे.

निविदा प्रक्रियेत समिती सहभाग घेईल मात्र यात चांगली व्यक्ती वा संस्था पुढे आली आणि त्यामुळे नाशिक साखर कारखान्याची प्रगती होत असेल तर त्यांना प्राधान्य देऊ. अन्यथा बाजार समिती कारखाना चालविण्यास सक्षम आहे.

– देवीदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

एकतर्फी निर्णय ?

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्ह्यात सुमारे २५ हजाराहून अधिक सभासद असतांना आज नाशिक साखर कारखाना सुरू करण्याबाबत झालेल्या बैठकीत केवळ बोटावर मोजण्याइतपत सभासद उपस्थित होते. याचा विचार करता आजच्या बैठकीत बाजार समिती संचालकांनी कारखाना चालविण्यासाठी एकतर्फी निर्णय घेतला का अशी शंका उपस्थित केली जात आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *