Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनिफाड @६ अंश सेल्सियस; हंगामातील सर्वात नीचांकी तपमान; नाशिकचाही पारा घसरला

निफाड @६ अंश सेल्सियस; हंगामातील सर्वात नीचांकी तपमान; नाशिकचाही पारा घसरला

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील जनतेला यंदा गुलाबी थंडी अनुभवता आलेली नसल्याचे चित्र असतानाच आज अचानक तपमानाचा पारा निफाडमध्ये ६ अंशांवर नोंदवला गेल्याने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हंगामातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद आज झाली आहे. निफाडसोबत नाशिक शहरातदेखील तपमानाचा पार ९.२ अंशांवर स्थिरावला आहे. वातावरण गारवा आणि वारा असल्यामुळे बोचऱ्या थंडीचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत…

- Advertisement -

राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात थंडी गायब झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची 11.4 अश सेल्सीअस अशी नोंद झाली होती. यानंतर अकरा दिवसांनंतर पुन्हा एकदा आज (दि.८) राज्यात नाशिक येथे ९.२ अंश सेल्सीअस अशी नोंद झाली.

डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात राज्यात बहुतांशी भागात किमान तापमानात लक्षणिय वाढ होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाला होता. परिणामी पावसाने मोठे नुकसान केले होते.

यानंतर मात्र राज्यातील थंडी गायब होऊन किमान तापमान 15 ते 20 अंशापर्यंत गेले होते. अशा बदलेल्या वातावरणात गेल्या 27 जानेवारीला नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी तापमान 11.4 अंश नोंद झाली होती.

यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान घरसले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पहाटे व रात्रीची थंडी वाढली गेली होती.

या बदलेल्या वातावरणानंतर आज नाशिक जिल्ह्यात पारा ९.२ अंशांपर्यंत खाली आला. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाडला झाली असून आज कुंदेवाडीच्या गहू संशोधन केंद्रात सकाळी तपमानाचा पार ६ अंशांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले.

नाशिक जिल्ह्यातील किमान तापमान 20 जानेवारीनंतर वर गेल्यानंतर आज पुन्हा ९.२ अंशावर आल्याने दिवसभर हवेत गारवा आला असून थंडीची तीव्रता अधिक वाढलेली दिसून आलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या