Friday, April 26, 2024
Homeनगरनिपाणीवडगाव शिवारात आढळला मातापूर येथील तरुणाचा मृतदेह

निपाणीवडगाव शिवारात आढळला मातापूर येथील तरुणाचा मृतदेह

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

अक्षय्य तृतीयेपासून (Akshayya Trutiya) बेपत्ता (Disappeared) असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) मातापूर (Matapur) येथील तरुणाचा मृतदेह (Youth Dead Body) काल निपाणी वडगाव (Nipani Wadgav) चौकी नं. 1 व पाटाच्या कडेला मांजरे वस्ती लगत श्री. रोकडे यांचे शेतातील आमराई परीसरात रेल्वे लाईनपासुन काही अंतरावर आढळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) मातापुर (Matapur) येथील सतीश बबन गायकवाड (वय 27) हा तरुण दि. 3 मे 2022 रोजी अक्षय तृतीया यादिवस पासून घरात कोणालाही माहिती न देता निघून गेला होता. त्यानंतर सदर तरूणाने नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) जेऊर हैबती (Jeur Haibati) या ठिकाणी नातेवाईकाच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रमप्रसंगी भेट दिली. त्यानतंर तेथुन पुढे सदर तरुणाबद्दल कुणालाही माहीती नव्हती. मांजरे वस्ती येथील तरुण प्रातःविधीसाठी जात असताना त्यास मयत व्यक्ती व शेजारी असलेली बॅग, चप्पल आढळून आली. यावेळी मांजरे या तरुणाने प्रसंगावधान राखत सदर मयत इसम याबाबत शेतमालक सुधीर रोकडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित माहिती ग्रामपंचायत सदस्य त्यांचे मामा सर्जेराव देवकर यांना कळविली. श्री. देवकर यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाशी संपर्क साधुन मयत इसमाविषयी माहिती दिली.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपुर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप (PI Sanjay Sanap) यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. याबाबत सदर तरुणाचे मामा मारोती गंगाधर गिरासे यांनी सदरचा मयत इसम माझा भाचा असून मातापूर (Matapur) येथील रहिवासी आहे. घरातील किरकोळ कुरबुरी वरून सदरचा इसम कोणालाही माहिती न देता निघून गेला होता, अशी माहिती श्री. गिरासे यांनी दिली. यावेळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना दिली. यावरून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठवण्यात आला.

यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे (Shrirampur Police Station) पोलीस हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक संतोष दरेकर, पोलीस नाईक रघुवीर कारखिले, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार श्री. राजगुरु, पोलीस नाईक श्री. गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांमधून येथील श्री. मांजरे, श्री. रोकडे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव देवकर, मातापूर येथील उपसरपंच श्री. गायके, नितीन पवार श्री. गिरासे यांचे सहकार्य लाभले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष दरेकर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या