Saturday, April 27, 2024
Homeनगरनववी, अकरावीचे 1 लाख 45 हजार विद्यार्थी बिनबोभाट पुढच्या वर्गात

नववी, अकरावीचे 1 लाख 45 हजार विद्यार्थी बिनबोभाट पुढच्या वर्गात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील करोनाचे प्रमाण वाढत असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही आता

- Advertisement -

परीक्षेविना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानूसार जिल्ह्यात नववी व अकरावीचे 1 लाख 45 हजार विद्यार्थी असून ते आता कोणतीही परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत.

राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय मागील आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर बुधवारी पुन्हा नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही शिक्षण मंत्र्यांनी हाच निर्णय कायम ठेवला.

नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न होता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीचे सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थी आहेत. त्याप्रमाणे नववीचे 81 हजार 200 व अकरावीचे 63 हजार 822 असे एकूण 1 लाख 45 हजार विद्यार्थी संख्या मागील वर्षीच्या पटसंख्यानुसार आहे. या सर्वांना आता परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

आता केवळ दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. तोही लवकरच होईल. दहावी बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार आहे. परंतु तरीही सध्याच्या वेळापत्रकात बदल होणार की आणखी काही वेगळा पर्याय समोर येणार याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश कंसात बारावीचे

अकोले 5056 (3718), जामखेड 2544 (2904), कर्जत 3796 (3307), कोपरगाव 6414 (4619), मनपा हद्द 6892 (7702) नगर 5853 (2844), नेवासा 6884 (4093), पारनेर 4538 (3221), पाथर्डी 4645 (5445), राहाता 6239 (5098), राहुरी 5215 (2873), संगमनेर 8640 (6584), शेवगाव 4491 (4440), श्रीगोंदा 4676 (3444) श्रीरामपूर. 5327 (3530) एकूण 81 हजार 200 नववी आणि 63 हजार 822 अकरावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या