Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनऊ एकर ऊस जळून ख़ाक

नऊ एकर ऊस जळून ख़ाक

डांगसौंदाने । वार्ताहर Dangsaundane

दिगंबरबोरसे यांचा सात एकर तर वंदना साहेबराव काकुळते यांचा दोन एकर ऊस जळुन ख़ाक झाला आहे.  या दोघा शेतकऱ्यांचे 10 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की,सटाणा डांगसौंदाने रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपाच्या समोर दिगंबर बोरसे यांचे व त्यांच्या कुटुंबियाच्या नावे असलेले बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी अनुक्रमे दिगंबर बोरसे यांच्या नावावरील 1 हेक्टर पत्नी च्या नावे असलेले 86 आर क्षेत्र तर मुलगा योगेश यांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आहे.

या संपूर्ण क्षेत्रात बोरसे यांनी आडसाली उसाची लागवड केली असुन आता थोड्याच् दिवसात कारखान्याच्या गाळपास जाणारा हा ऊस आजच्या आगीत संपूर्णपने जळून ख़ाक झाला आहे. तर या उसाला केलेले ठिबक सिंचन ही संपुर्ण पणे जळाले आहे. याच क्षेत्राला लगत असलेला वंदना काकुळते यांचा ही दोन एकर उस जळाल्याने त्यांचे ही चार लाखांचे नुकसान झाले आहे.

या ऊसाबरोबर नेटाफेम कंपनीचे ठिबक सिंचन ही संपूर्ण पणे जळाले आहे. बोरसे यांच्या शेतात विजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा पूर्ण पणे लोंबकळल्याने बोरसे यांनी विजवितरणच्या स्थानिक कर्मचारी अणि अधिकारी यांना याची कल्पना ही दिली होती.

याबाबत शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असुन असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असतांना कुठल्याही शेतकऱ्यांची दखल या अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याने विजवितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

आज शेतपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे उद्या कोणाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण ?असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे . या नुकसानीची पाहणी विजवितरणच्या स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी केली असुन स्थानिक तलाठी आतिश कापड़नीस यांनी महसुल विभागाच्या वरिष्ठांना माहिती देत पंचनामा केला आहे.

माझे आज 10 लाखांचे नुकसान झाले कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होताच हा ऊस कारखान्यात गाळपसाठी जाण्यासाठी सज्ज असताना आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडला विजवितरण कड़े वेळोवेळी तक्रार केली होती मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने आज मोठे नुकसान झाले नुक़सान भरपाई मिळावी

दिगंबर बोरसे शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या