Friday, April 26, 2024
Homeनगरनिमोणसह पाच गावांचा पाणीप्रश्न मार्गी - ना. थोरात

निमोणसह पाच गावांचा पाणीप्रश्न मार्गी – ना. थोरात

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना पाणीपुरवठा होणार असल्याने पाच गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी

- Advertisement -

लागणार आहे, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील कर्हेफाटा खंडोबा मंदिर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या निमोणसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, इंजि. बी. आर चकोर, संपतराव गोडगे, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, मिराताई शेटे, सुनंदाताई जोर्वेकर, आर .बी. राहाणे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर सांगळे, गणपत सांगळे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अर्चना बालोडे, संतोष हासे, विष्णू ढोले, रोहिदास सानप, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. जी.सराफ, उपअभियंता एम. बी क्षीरसागर, शाखा अभियंता अशोक लोणारे उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. निमोणतळेगाव परिसरातही चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. तळेगाव परिसरातील गावांसाठी प्रवरा नदीवरून थेट पाईपलाईन योजना आणली तिचे पाणी देवकौठेपर्यंत मिळत आहे. सदर योजना योजना 16 गावांना पाणी पुरवित आहे.

या योजनेप्रमाणेच निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांचा पाणी प्रश्न प्रादेशिक योजनेमुळे मार्गी लागणार आहे. भोजाजूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे या गावांना पाणी उपलब्ध होणार असल्याने विजेच्या खर्चात बचत होऊन नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल. तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी सुरू आहेत.

तालुक्यातील जनतेवर आपल्या जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले असून आपणही कायम अविश्रांतपणे काम केले आहे. राज्यात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्‍या असतानासुद्धा संगमनेर तालुक्यातील वाडी वस्ती वरील प्रत्येक नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करत आहोत. संगमनेर तालुका हा सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून राज्यात मॉडेल ठरावा यासाठी आपला कायम प्रयत्न राहिला असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक तालुक्यात वाडी वस्तीवर आणि गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. प्रत्येक गावात रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, विद्युत जाळे निर्माण केले आहे. तालुका विकासातून वैभवाकडे जात आहे.

या प्रादेशिक योजनेमुळे या गावातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याकामी इंजि. बी. आर.चकोर, इंद्रजीतभाऊ थोरात यांनीही कायम पाठपुरावा केला असून भोजापूर धरणातील जॅकवेलचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे..

इंजि. बी. आर. चकोर म्हणाले की, निमोण परिसरातील या गावांवर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रेम केले असून या गावांना कायम पाणी पुरवठा व्हावा यासाठी दूरदृष्टीतून त्यांनीही कल्पना मांडली. संगमनेर शहराला याप्रमाणे पाणीपुरवठा होतो आहे. तसाच ग्रॅव्हिटीद्वारे या पाचही गावांना पाणीपुरवठा होणार आहे.

मंत्रालयातील मंजुरी, वन विभागाच्या मंजुरी जलदगतीने काम होण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना यासाठीचा आढावा नामदार थोरात कायम घेत असून याकामी इंद्रजीत थोरात ही पाठपुरावा केला आहे. मिराताई चकोर यांनी या योजनेच्या पाठपुराव्यासाठी खूप आग्रह धरला असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

निमोणसह पाच गावांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. भोजापूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही ही पूर्णत्वास येत आहे. 15 किलोमीटरची ही पाईपलाईन असून यामधून ग्रॅव्हिटीद्वारे या पाच गावांना पाणी मिळणार आहे.

मंत्री थोरात यांच्याहस्ते या पाणी पुरवठा योजनेचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. प्रसंगी अनिल घुगे, मोहनराव करंजकर, विलास कवडे, बाबासाहेब कडनर, पांडुरंग फड, गंगाधर जायभाये, पांडूरंग गोमासे, तुकाराम सांगळे, राजू सानप, किसन पाटील, सुभाष सानप, चंद्रकांत घुगे, साहेबराव आंधळे, ज्ञानेश्वर घुगे, जबाजी मंडलीक, सुदाम गायकवाड, ज्ञानेश्वर कांडेकर, भीमा कांडेकर, शंकर लहरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या