Friday, April 26, 2024
Homeनगरनिमोण प्रादेशिक पाणी योजनेसाठी 10 कोटी 61 लाख रुपये निधी मंजूर

निमोण प्रादेशिक पाणी योजनेसाठी 10 कोटी 61 लाख रुपये निधी मंजूर

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर असून या योजनेच्या कामासाठी नव्याने 10 कोटी 61 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात सहकारी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि. बी. आर. चकोर यांनी दिली.

- Advertisement -

माहिती देताना इंद्रजीत थोरात यांनी सांगितले, करोनाच्या संकटानंतर संगमनेर तालुक्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मोठा निधी मिळविला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. मागील 15 दिवसांमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 14 गावांसाठी सुमारे 47 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर आता नव्याने निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पळसखेडे व पिंपळे या पाच गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 10 कोटी 61 लाख 97 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. निमोण ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भोजापूर धरणातून होत असून या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाच गावांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. 15 किलोमीटर लांबीची जलवाहिनी करण्यात येत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जलजीवन मिशन योजनेतून नव्याने निधी मिळाल्याने या कामाला अधिक गती मिळणार असून पाचही गावांतील नागरिकांना थेट आपल्या घरात हे पाणी मिळणार आहे.

त्यामुळे सर्व परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या वाढीव निधीचे पत्र पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिले असून या योजनेचा पाठपुरावा करणे कामी मंत्री थोरात, आमदार डॉ. तांबे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, इंजि. बी. आर. चकोर यांचे सहकार्य लाभले असून या निधीमुळे निमोण, कर्‍हे, पळसखेडे, पिंपळे व सोनेवाडी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या