Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिमगाव-सिन्नर : सरपंच निवडणूकीनंतर जमावाकडून वाहनांची तोडफोड

निमगाव-सिन्नर : सरपंच निवडणूकीनंतर जमावाकडून वाहनांची तोडफोड

सिन्नर| प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील शांततेत पार पडणार्‍या सरपंच उपसरपंच निवडणुकीला गालबोट लागले असून निमगाव-सिन्नर येथे सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीवेळी पोलिस संरक्षणात आलेल्या सरपंचपदाच्या महिला उमेदवारासह तिघा सदस्यांवर तसेच पोलिसांवरही ग्रामस्थांनी हल्ला करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.

- Advertisement -

यात महिला पोलिसासह एक अधिकारी व एक पोलिस कर्मचारी तसेच काही ग्रामस्थ जखमी झाले आहे. दरम्यान अनुसूचित जमातीच्या सरपंचपदाच्या महिला उमेदवारास ग्रामस्थांनी निवडणुक कक्षापर्यंत पोहचू न दिल्याने सरपंचपद रिक्त राहिले असून उपसरपंचपदी सुनंदा आव्हाड यांची निवड झाली आहे.

निमगाव-सिन्नर निवडणुकीत बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखालील श्रीकृष्ण पॅनलने 7 जागा जिंकून आघाडी घेतली होती. येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने व या प्रवर्गातून चंद्रकला गुंजाळ ही महिला देखील या पॅनलकडून विजयी झाली होती. त्यामुळे सरपंचपद बिनविरोध होणार हे जवळपास निश्‍चित होते मात्र उपसरपंचपदासाठी शिवाजी शेळके व सुनंदा आव्हाड यांच्यात रस्सीखेच होती. मात्र निवडीपूर्वी सरपंचपदाची उमेदवार चंद्रकला गुंजाळ आणि सुनंदा आव्हाड विरोधी रोकडेश्‍वर पॅनलच्या सदस्यांना जाऊन मिळाल्याचा आरोप पॅनलचे नेते बाळासाहेब सानप यांनी केला.

दरम्यान, निवडणुक प्रक्रियेसाठी गुंजाळ, आव्हाड ह्या गावात आल्या असता ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनांना घेराव घातला. व त्यांना अडवत प्रक्रियेसाठी जाण्यापासून रोखण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जमा होत्या. त्यांनी सदर सदस्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. काही ग्रामस्थांनी वाहनाची तोडफोड केली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

यात पोलिस हवालदार धुमाळ, महिला पोलिस अश्‍विनी वाजे व पोलिस शिपाई सांगळे यांना मुका मार लागला. या गदारोळात सरपंचपदाच्या उमेदवार चंद्र्रकला गुंजाळ यांना काही ग्रामस्थांनी घेराव घालून निवडणुक कक्षात जाण्यापासून रोखले त्यामुळे सरपंचपदाची निवड होऊ शकली नाही. तर उपसरपंचपदासाठी सुनंदा आव्हाड यांची चिठ्ठीने निवड झाली.

दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी जवळपास 60 ते 70 जणांविरोधात भादंवि कलम कायदेशिर 3.3.332 फिर्याद. आहे 341., 143, 147, 148, 14 9, 427,504,506 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135प्रमाणे गुुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार धुमाळ करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या