Saturday, April 27, 2024
Homeनगरअखेर निंबोडी सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती

अखेर निंबोडी सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निंबोडी मल्हार (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीकडून राजकीय आकसापोटी 120 सभासद शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू होती.

- Advertisement -

या विरोधात जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या आदेशाने सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करत असल्याचे पत्र काढले आहे.

निंबोडी मल्हारच्या विविध कार्यकारी सोसायटीकडून सभासद असलेल्या गावातील शेतकर्‍यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील 120 शेतकर्‍यांचे खरीप पीक कर्ज देण्यात आले नाही. मागील महिन्यात जनआधार संघटनेने तालुका उपनिबंधक यांच्या कार्यालयात आंदोलन केल्यानंतर 60 शेतकर्‍यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली होती.

तरी देखील सोसायटीने मंजूर झालेल्या 60 शेतकर्‍यांना दीड महिना होऊनही कर्जाची रक्कम अदा केली नाही. मागील आठवड्यात संघटनेच्यावतीने पुन्हा जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात सात तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिलेल्या आदेश व सुचनांनी अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले व संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहकार खात्याने या सोसायटीवर कारवाई केली आहे.

आंदोलनात प्रकाश पोटे, सरपंच जयराम बेरड, वजीर सय्यद, अंबादास बेरड, संतोष उदमले, भैरवनाथ बेरड, मिजान कुरेशी, संदीप पानसरे, रावसाहेब झांबरे, शैलेश भोसले, दीपक गुगळे, अंबादास कराळे, सागर शिंदे, जोगेश गवळी, अजय सोलंकी, विक्रम बेरड, नाथा बेरड, गणेश निमसे, गौरव बोरकर, दत्तू पोकळे, राजू बेरड, शिवाजी जासूद, अशोक आढाव, पांडुरंग निंबाळकर, दीपक बेरड, भैय्या कराळे, सागर जाधव, राहुल शिंदे, खंडेराव बेरड, भाऊसाहेब साळवे, अर्जुन कराळे, दिगंबर शेलार यांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या