निंभारीच्या फर्निचर दुकानाचा पत्रा उचकटून 66 हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी

jalgaon-digital
1 Min Read

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील निंभारी येथील फर्निचर दुकानातून सुमारे 66 हजार रुपये किंमतीच्या 7 प्रकारच्या 13 वस्तूंची चोरी झाल्याची घटना 4 मार्च रोजी रात्री घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जनार्धन विष्णू पवार रा. निंभारी ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 4 मार्च रोजी रात्री 9 वाजता निंभारी शिवारातील फर्निचर दुकान बंद करून घरी गेल्यानंतर 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांचा मुलगा दुकान उघडण्यासाठी गेला असता दुकानाचा पाठिमागील पत्रा कापलेला दिसला. तेव्हा कुलूप उघडून दुकानात जाऊन पाहिले असता 17 हजार 990 रुपये किमतीचा एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही,

20 हजार रुपये किमतीचे बेस्टऑन कंपनीचे प्रत्येकी दहा हजारांचे दोन टीव्ही, 9 हजार रुपये किंमतीचा वेस्टेल कंपनीचा टीव्ही, हायबोन कंपनीचा 9500 रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही, 6 हजार 875 रुपयांचे प्रत्येकी 1375 रुपये किंमतीचे ज्योती कंपनीचे मिक्सर, 990 रुपये किंमतीचा अरिहंत कंपनीचा सिलींग फॅन, प्रत्येकी 750 रुपये किमतीचे फॉर्च्युनर रुम हिटर अशाप्रकारे एकूण 65 हजार 855 रुपयांच्या वस्तूंची चोरी झाली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *