Friday, April 26, 2024
Homeनगरनिळवंडेतील साठा 93 टक्क्यांवर

निळवंडेतील साठा 93 टक्क्यांवर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात बुधवारी पावसाचा जोर ओसरला असलातरी धिम्यागतीने पाण्याची आवक होत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा 93 टक्क्यांवर पोहचला आहे.

- Advertisement -

गत चार दिवसांपासून घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस होत असल्याने तुडूंब असलेल्या भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक झाली. हे सर्व पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. ते निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढत गेला. काल सायंकाळी पाणीसाठा 7745 दलघफू (93 टक्के) झाला होता. पाऊस ओसरल्याने पाण्याची आवक मंदावली आहे.

भंडारदरातून 1429 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाचा केवळ 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी तलावातून सोडण्यात येणारा ओव्हरफ्लो बंद करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या