निळवंडेच्या उपसा सिंचन योजनेमुळे हक्काचे पाणी कमी होणार

jalgaon-digital
3 Min Read

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या आम्हाला लाथा घाला पण आम्हाला सरकारमध्ये ठेवा अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे. आघाडी सरकारमधील आमदारांमध्येच निधी मिळण्यावरून हेवेदावे सुरू झाले आहेत. अडीच वर्षात दमडीचीही मदत राज्य सरकार करु शकले नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील एकरुखे येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी केले.

यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, प्रतापराव जगताप, पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्रीनिवास वर्पे, जि. प. सदस्य शाम माळी, पंचायत समिती सदस्या सुवर्णा तेलोरे, उपअभियंता देविदास धापटकर, सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, रांजणगावच्या सरपंच सुनीता कासार, भाऊसाहेब गाढवे, बाळासाहेब गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. विखे पाटील म्हणाले की, या महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार देऊ, असे जाहीर करूनही अद्याप शेतकर्‍याच्या खात्यावर दमडीही जमा केला नाही. या सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची सरकारमधील काँग्रेसची अवस्था आम्हाला लाथा घाला पण सरकारमध्ये राहु द्या अशी परिस्थिती झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे निधीच्या नावाखाली सध्या खायचे काम चालू आहे. शिवसेनेचा एकही नेता यांच्यापुढे बोलण्याची हिम्मत करत नाही.

केंद्रातील मोदी सरकारची प्रत्येक योजना यशस्वी होत असून त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना होत असल्याकडे लक्ष वेधून घेत अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना केंद्र सरकारनेच मदतीचा हात दिला. मात्र राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. यापुर्वीही पुणतांब्यामध्ये शेतकर्‍यांचा संप झाला होता. त्यावेळी आत्ताचे मुख्यमंत्री आले होते. त्यांनी मोठमोठी आश्वासने शेतकर्‍यांना दिली होती. परंतु कोणत्याही आश्वासनाची पुर्तता त्यांच्याकडून झाली नसल्यामुळेच शेतकर्‍यांना पुन्हा आंदोलन करावे लागत असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार वाहून आ. विखे पा म्हणाले की, अहिल्याबाई होळकर हे कर्तृत्वसंपन्न असे व्यक्तिमत्त्व होते. त्यातच एकरुखे ग्रामपंचायतच्यावतीने शुद्ध पाणी पुरवठ्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन गावाला शुद्ध पाणी पुरवठा सरपंच आणि त्यांच्या टीमने केला. विशेषतः एकरुखेचे राजकारणात जितेंद्र आणि देवेंद्र यांनी विकासासाठी स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेऊन गावचा विकास काम करीत असल्याचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे आ. विखे पा. म्हणाले.

यावेळी सोसायटीचे नं. 2 अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, दिलीपराजे सातव, मकरंद आभाळे, वज्रेश्वरी पतसंस्थेचे आद्य प्रवर्तक गोरख मोटे, सोसायटी नं. 1 चे अध्यक्ष दिलीप क्षिरसागर, मच्छिंद्र आभाळे, सोपानराव कासार, अनिल गाढवे, मधुकर सातव, तलाठी श्रीमती कव्हाळे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र बोरसे, दशरथ साळुंखे, गोरक्षनाथ सापिके, दत्तात्रय कासार, रमाकांत आग्रे, गणेश थोरात, योगेश आग्रे, विजय सापिके, गोरख बोर्डे, रवी गायधने, सलीम शेख, बाळासाहेब आग्रे, मेजर महेश हिरवे, रमेश वायकर, वज्रेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ कार्ले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाम आभाळे, राजेंद्र बिलबिले, रघुनाथ बोर्डे, अरुण गाढवेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *