जीवनात निळवंडे धरणग्रस्तांकरिता केलेल्या कामाचे चीज झाले- मधुकरराव पिचड

jalgaon-digital
2 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निळवंडे धरणावर येवून धरणाचे, उच्च स्तरीय कालव्यांचे, पिंपरकणे पुल व धरणाच्या पाठीमागेच्या लिफ्ट (पाणी योजना) यांचे लोकार्पण व भुमिपूजन केले, हे सर्व पाहून आयुष्यात मी निळवंडे धरणाकरीता व निळवंडे धरणग्रस्त शेतकर्‍यांकरीता केलेल्या कामांच्या प्रयत्नांचे चीज झाले आहे, असे भावनिक उद्गार माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी काढले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरण लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी येतात, हे पाहिल्यानंतर निळवंडे धरणासाठी केलेले काम व शेतकर्‍यांची शेती समृध्द होण्यासाठी केलेले काम कळत नकळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कामाची दखल घेतली व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहीले याचा आनंद वाटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेता आली, त्यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी विचारपुस केली, तो क्षण अतिशय भाग्याचा वाटतो.

जो शेतकरी अनेक वर्षापासून आपल्या शेतामध्ये निळवंडे धरणाचे पाणी कधी येईल तो काल सोन्याचा दिवस उगवला. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर सीमा उल्लंघन करून सोने रुपी निळवंडे धरणाचे पाणी देवून नरेंद्र मोदी यांनी दसर्‍याची अनमोल भेट दिली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे तसेच या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो.

काल झालेल्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा अहमदनगर जिल्हा प्रगतीकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची मदत होईल, अशी अपेक्षा माजी मंत्री पिचड यांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *