Friday, May 10, 2024
Homeनगर365 कोटींच्या तरतुदीमुळे निळवंडे कालव्यांच्या कामांना गती - आशुतोष काळे

365 कोटींच्या तरतुदीमुळे निळवंडे कालव्यांच्या कामांना गती – आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने करोना संकटात देखील निधी कमी पडू दिला नाही. 2024 पर्यंत जिरायती भागातील गावात टेल टू हेड पाणी पोहोचलेच पाहिजे असा महाविकास आघाडी सरकारने निर्धार केला आहे. त्यामुळे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 365 कोटींची तरतूद निळवंडे कालव्यांसाठी करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पावर यांनी केली आहे. त्यामुळे निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळणार असल्याचे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सांगितले.

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील कोपरगाव,अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यांतील दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या 182 गावांना वरदान ठरणार्‍या व 68,848 हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार्‍या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती न मिळाल्यामुळे निळवंडे कालव्यांची कामे रेंगाळली होती. त्यामुळे मागील काही दशकांपासून या भागातील शेतकरी चातकाप्रमाणे निळवंडेच्या पाण्याची आस लावून बसले होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यातून निळवंडे कालव्यांना मागील दोन वर्षांत करोनाचे संकट असताना देखील जवळपास 491 कोटी निधी मिळाला असून निळवंडे कालव्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.

त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील नागरिकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे. 2024 पर्यंत या सर्व जिरायती भागातील गावांना टेल टू हेड पाणी देण्याचा निर्धार केलेल्या महाविकास आघाडी सरकारने 2022/23 च्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यामध्ये निळवंडे कालव्यांसाठी 365 कोटी निधीची तरतूद करण्यात आली. ही निळवंडे कालवा लाभ क्षेत्रातील 182 गावातील शेतकरी व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

यावर्षी निळवंडे कालव्यांसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद व ज्याप्रक्रारे महाविकास आघाडी सरकार सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ते पाहता अनेक वर्षांपासून निळवंडेच्या पाण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकर्‍यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 2024 पर्यंत नक्कीच निळवंडे कालवे वाहतील व 182 गावांतील परिसर सुजलाम् सुफलाम् होणार आहे तो दिवस दूर नाही असे ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या