Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात सोमवारपासून रात्रीची संचारबंदी; काय सुरू, काय बंद? वाचा 'एका क्लिकवर'

पुण्यात सोमवारपासून रात्रीची संचारबंदी; काय सुरू, काय बंद? वाचा ‘एका क्लिकवर’

पुणे | Pune

करोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असल्याचं वाटत असताना राज्यात करोनाच्या (Corona) विषाणूचे नवे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus Variant) धोका वाढल्याने पुन्हा एकदा शुक्रवारी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध जाहीर केले आहे.

- Advertisement -

करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) कठोर निर्बंध लागू (New restrictions in Pune) करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता पुणे महानगरपालिका क्षेत्रात लेवल 3 चे निर्बंध लागू असणार आहेत हे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

काय सुरु आणि काय बंद?

१) अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.

२) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त असलेले सर्व दुकाने हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.

३) मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद

४) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. दुपारी चार नंतर आणि शनिवार-रविवारी पार्सल सेवा सुरु ठेवण्यास मुभा.

५) लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील, शासकीय कर्मचारी, बंदरे सेवा, विमानतळ सेवा यांना प्रवास करण्यास परवानगी

६) उद्याने, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरु राहील.

७) सर्व खासगी कार्यालयांमध्ये फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक, तसेच कार्यालये फक्त संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

८) शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

९) सर्व आऊटडोअर स्पोर्ट्स सकाळी पाच ते नऊ या दरम्यान सुरु राहतील.

१०) सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी. कार्यक्रम फक्त ३ तासांचा असावा. याशिवाय या ठिकाणी खाद्यपदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

११) धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद. फक्त पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी परवानगी

१२) लग्नासाठी ५० लोकांची परवानगी

१३) अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी किंवा त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांसाठी फक्त २० लोकांना परवानगी

१४) कामगारांची राहण्याची व्यवस्था असेल त्याचठिकाणी बांधकाम सुरु राहील.

१५) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार.

- Advertisment -

ताज्या बातम्या