Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : निगडोंळ येथे तुफान गारपीट; निर्यातक्षम द्राक्ष्यांना पडल्या भेगा

Video : निगडोंळ येथे तुफान गारपीट; निर्यातक्षम द्राक्ष्यांना पडल्या भेगा

ओझे | वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्याच्या (Dindori Taluka) पश्चिम भागात (western area) काल सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (nonseasonal rain) व तुफान स्वरूपाची गारपीट झाल्यामुळे द्राक्षबागा भुईसपाट (grapes farm damaged) झाल्या आहेत. कादा, गहू, इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजाचा पाय अधिकच खोलात रुतला आहे….

- Advertisement -

प्रशासनाने गारपिट झालेल्या परिसराचे त्वरित पंचनामे करावे आशी मागणी बळीराजा कडून होत आहे.

काल (दि ११) सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास वातावरण अचानक बदल घेऊन वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्यामुळे निगडोंग (Nigdong), उमराळे खुर्द (Umrale Khurd) या परिसराचा दक्षिण परिसरात मध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.

त्याचप्रमाणे म्हेळुस्के, कादवा माळुगी (Kadva Mhalungi), नळवाडी (Nalwadi), निळवंडी (Nilwandi), पाडे (Pade), मडकीजांब (Madakijamb), जांबुटके (Jambutake), उमराळे बुद्रक, हातनोरे, वलखेड या परिसरातहि मध्यम ते अवकाळी स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला.

तालुक्यातील निगडोंळ (Nigdol) येथे मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यांमुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने येथील पंचनामे त्वरित करण्याची मागणी निगडोंळ येथील द्राक्ष उत्पादक योगेश मालसाने ,राजू मालसाने,भाऊसाहेब मालसाने, तुकाराम मालसाने, शिवाजी मालसाने, केशव मालसाने, निवृती मालसाने, दिपक मालसाने, तुकाराम मालसाने, अनिल मालसाने आदिनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या