Saturday, April 27, 2024
Homeनगरएन.एच.160 च्या वंचित 40 प्रकल्पबाधितांना मिळाली 2 कोटी 2 लाख 56 हजार...

एन.एच.160 च्या वंचित 40 प्रकल्पबाधितांना मिळाली 2 कोटी 2 लाख 56 हजार भरपाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातून (Kopargav Taluka) एन.एच. 160 (NH 160) हा राष्ट्रीय महामार्ग (National Highways) जात आहे. या महामार्गासाठी अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित (Farmer Land Edited) करून त्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. परंतु शासकीय जागेवर वास्तव्यास असणार्‍या नागरिकांना भरपाईपासून (Compensation) वंचित ठेवण्यात आले होते. त्याबाबत साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे (Saibaba Sansthan President Ashutosh Kale) यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून शासकीय जागेवर राहणार्‍या 40 नागरिकांना 2 कोटी 2 लाख 56 हजार 598 रुपयांची नुकसान भरपाई (Compensation) मिळाली आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

कोपरगाव तालुक्यातून (Kopargav Taluka) राष्ट्रीय महामार्ग एन.एच.160 (NH 160) जात असून या महामार्गामुळे प्रकल्पबाधित होणार्‍या शेतकर्‍यांना व अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीचा व होणार्‍या नुकसानीचा (Loss) योग्य मोबदला देण्यात आला आहे. मात्र जे नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते, ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु होते त्या जागा संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र त्या जागा सबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मंत्री शंकरराव गडाखांसह मुलाच्या हत्येचं कारस्थान?

यामध्ये देर्डे कोर्‍हाळे (Derde Korhale) व चांदेकसारे (Chadeksare) येथील अनेक नागरिकांचा समावेश होता. त्याबाबत या नागरिकांनी ना.आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांची भेट घेवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे साकडे घातले होते. ना. काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), प्रातांधिकारी गोविंद शिंदे (Prantadhikari Govind Shinde), एन.एच.160 (NH 160) चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. हे नागरिक जरी शासकीय जागेवर राहत असले तरी एन.एच.160 मुळे या नागरिकांचे हक्काचे घर व व्यवसाय हिरावले जाऊन या नागरिकांच्या होणार्‍या नुकसानीचा विचार करावा. जागा जरी शासनाची असली तरी त्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतींचा रीतसर आकारला जाणारा शासकीय कर हे नागरीक आजपर्यंत अदा करीत आलेले आहेत.

अतिरिक्त ‘सुरक्षा ठेव’ बिलाबाबत संभ्रम!

राष्ट्रीय महामार्ग एन.एच.160 मुळे शासकीय जागेवरील ज्या नागरिकांचे घर, व्यवसाय बाधित झाले आहेत. त्या नागरिकांच्या होणार्‍या नुकसानीचे मुल्यांकन करून त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात यावी यासाठी ना. आशुतोष काळे आग्रही होते व शासनदरबारी पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशातून भरपाईपासून वंचित असलेल्या नागरिकांना 2 कोटी 2 लाख 56 हजार मोबदला देण्यात आला आहे. यामध्ये देर्डे कोर्‍हाळे व चांदेकसारे येथील 40 नागरिकांचा समावेश आहे.

तालुक्यातून एन.एच.160 नवीन राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आला. एन.एच.160 साठी क्षेत्र व मालमत्ता संपादित करण्यात आल्या मात्र आम्ही शासकीय जागेवर वास्तव्यास असल्यामुळे आम्हाला भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्याबाबत आम्ही वंचित प्रकल्पबाधित नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांच्यापुढे कैयित मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले. आमच्या होणार्‍या नुकसानीची त्यांनी दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता व एन.एच.160चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्यासोबत बैठका घेतल्या. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला न्याय मिळाला असून त्यांनी आमच्या कुटुंबाची होणारी परवड थांबवली. आमच्यासाठी आशुतोष यांच्या रूपाने देवच धावून आला.

– वंचित प्रकल्पबाधित

- Advertisment -

ताज्या बातम्या