Thursday, April 25, 2024
Homeनगरपुढील दोन दिवस पावसाचे

पुढील दोन दिवस पावसाचे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा मोसमी पाऊस (rain) जोरदार होईल असाच अंदाज हवामान विभागाने (Weather department Guess) व्यक्त होता. त्यानुसार वेळेवरच मन्सून महाराष्ट्रासह (Maharastra) देशभरात दाखल झाला. मात्र, आता नंतर पावसाने बर्‍याच भागात खंड घेतला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत (Farmers worried) आहेत. मात्र, शनिवारपासून राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असून पुढील दोन दिवसात अनेक भागात तुरळकसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याचे हवामान विभागाने (Weather department) म्हटलेले आहे.

- Advertisement -

आयएमडी(IMD) पुणे विभागाच्या संकेत स्थाळवर दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, (Central Maharashtra) मराठवाडा (Marathwada) तर विदर्भात (Vidarbha) अनेक ठिकाणी अनेक मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर बहुतांश राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.

देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर मात्र पावसाने काही ठिकाणी उघडीप दिली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. मात्र, पाऊस होत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, आता पुढील दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather department Guess) व्यक्त केला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. यंदा मान्सूनमध्ये देशभरात चांगला पाऊस होईल असा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा प्रत्ययही येत आहे.

सुरुवातीलाच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता जाणवणार नाही. यंदा बदललेल्या हवामानाचाही अनुभव नागरिकांना मिळाला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. तौक्त चक्रीवाादळामुळेही (Cyclone) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मे महिन्यांत देशभरात अनेक ठिकाणी पावसाचेच वातावरण होते. त्यानंतर आता मान्सून दाखल झाला आहे. यावेळीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातही(Ahmednagar District) शनिवारी अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला.

- Advertisment -

ताज्या बातम्या