Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासाफाटा येथे राजमुद्रा चौकात विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

नेवासाफाटा येथे राजमुद्रा चौकात विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Pahata

नगर-औरंगाबाद रोडवर (Nagar-Aurangabad Road) नेवासा फाटा (Newasa Pahata) येथील राजमुद्रा चौकात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या विचि अपघातात (Accident) सात चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Loss) झाले. नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

- Advertisement -

या अपघातातील (Accident) एक वाहन तर अक्षरशः दुभाजकावर चढून उलटून शेजारच्या दुकानात जाता जाता राहिले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी जमलेल्या नेवासा फाटा (Newasa Phata) येथील व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी रस्तादुभाजक त्वरित काढण्यात यावे अशी मागणी (Demand) करून संताप व्यक्त केला.

काही दिवसांपुर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) नेवासा फाटा (Newasa Phata) येथे रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविले आहेत. अहिल्यादेवी होळकर चौक, आंबेडकर चौक आणि राजमुद्रा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आधीच अरुंद रस्ता, मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण आणि त्यातच आता नव्याने बसवलेले रस्ता दुभाजक यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

पाऊस पडल्यानंतर तर रात्रीच्या वेळी रस्ता दुभाजक अजिबातच लक्षात येत नाही. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांनी रस्ता दुभाजक बसवायलाच विरोध केला होता. परंतु त्या विरोधाला न जुमानता रस्ता दुभाजक बसविण्यात आले आणि अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आता हे दुभाजक काढण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या