Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने नेवाशात राजकीय हालचाली सुरु

नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने नेवाशात राजकीय हालचाली सुरु

नेवासा |शहर प्रतिनीधी| Newasa

निवडणूक आयोगाने नेवासा नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यामुळे शहरात राजकीय हालचाली सुरु झाल्या असून इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. कोण अर्ज भरणार, कोणाविरुद्ध कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असणार याच्या चर्चा सुरु झाल्या असून इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डींग लावण्याचे आडाखे बांधत आहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी 20 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करणार असून 22 ते 28 जुलै 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 29 जुलै रोजी छाननी होवून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागे घेता येतील. 18 जुलैला मतदान होवून दुसर्‍या दिवशी मतमोजणी होईल. प्रभागनिहाय आरक्षण सोडत गेल्या महिन्यात 13 तारखेला काढण्यात आली होती.

हरकतींनंतर अंतिम मतदार याद्या 5 जुलैला प्रसिद्ध झाल्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 979, प्रभाग 2 मध्ये 1112, प्रभाग 3 मध्ये 1325, प्रभाग 4 मध्ये 982, प्रभाग 5 मध्ये 605 मतदार आहेत. प्रभाग 6 मध्ये 1168, प्रभाग 7 मध्ये 979, प्रभाग 8 मध्ये 836, प्रभाग 9 मध्ये 384, प्रभाग 10 मध्ये 1198, प्रभाग 11 मध्ये 1199, प्रभाग 12 मध्ये 1431, प्रभाग 13 मध्ये 843 प्रभाग 14 मध्ये 1422, प्रभाग 15 मध्ये 775, प्रभाग 16 मध्ये 1368 तर प्रभाग 17 मध्ये 1127 मतदार आहेत. सर्व 17 प्रभागांत मिळून एकूण 17 हजार 733 एवढी मतदारसंख्या आहे.

2017 च्या नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत प्रभाग 1 हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होता येथे योगिताताई पिंपळे या निवडून आल्यानंतर त्या नगराध्यक्षा झाल्या होत्या. हा प्रभाग पुन्हा महिला सर्वसाधारण आरक्षित झाला आहे. प्रभाग 2 मध्ये अनुसुचित जाती स्त्री आरक्षण होते येथे शालिनीताई सुखदान या निवडून आल्या होत्या आता हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. प्रभाग 3 हा सर्वसाधारण होता येथे उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे निवडून आले होते, आता सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 4 हा नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री होता येथे अर्चना डोकडे या विजयी झाल्या होत्या. आता हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 5 सर्वसाधारण होता.

येथे सचिन नागपुरे हे निवडून आले होते. आता हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 6 सर्वसाधारण (महिला) होता. येथे अर्चना कुर्‍हे या निवडुन आल्या होत्या. आता हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. प्रभाग 7 सर्वसाधारण (महिला) होता येथे डॉ. निर्मला सांगळे या निवडुन आल्या होत्या आता सर्वसाधारण झाला आहे. प्रभाग 8 अनुसुचित जाती होता येथे सचिन वडागळे हे निवडुन आले होते. आता हा प्रभाग अनुसुचित जमाती झाला आहे प्रभाग 9 ओबीसी होता येथे रणजीत सोनवणे निवडुन आले होते. आता हा प्रभाग अनुसुचित जाती (महिला) झाला आहे.

प्रभाग 10 हा सर्वसाधारण (महिला) होता येथे अंबिका इरले या निवडुन आल्या होत्या आता अनुसुचित जाती झाला आहे. प्रभाग 11 सर्वसाधारण होता येथे संदीप बेहळे हे निवडुन आले होते आता हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 12 हा ओबीसी राखीव होता येथे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील हे निवडुन आले होते. आता हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 13 हा सर्वसाधारण (महिला) होता येथे फिरोजाबी पठाण निवडुन आल्या होत्या आता हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे.

प्रभाग 14 ओबीसी महिलेसाठी राखीव होता. येथे सिमा मापारी या निवडुन आल्या होत्या. आता हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे. प्रभाग 15 सर्वसाधारण होता येथे दिनेश व्यवहारे हे निवडुन आले होते. आता हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 16 हा सर्वसाधारण होता. येथे फारुख आत्तार हे निवडुन आले होते आता हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) झाला आहे. प्रभाग 17 हा अनुसुचित जमाती (महिला) होता. येथे प्रथम माजी नगराध्यक्षा संगिता बर्डे आल्या होत्या. आता हा प्रभाग सर्वसाधारण झाला आहे.

प्रभाग क्रमांक 2, 6, 7, 13, 14, 17 हे प्रभाग सर्वसाधारणसाठी असून नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी असल्याने या ठिकाणी रंगदार लढत होणार आहे. 2017 च्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी पक्षाचे 9 उमेदवार निवडून आले होते. 1 अपक्ष 1 काँग्रेस व 6 भाजपाचे निवडुन आले होते. मात्र नगराध्यक्ष पद अनुसुचित जमाती (महिला) साठी होते येथे भाजपाच्या संगिता बर्डे या निवडून आल्याने नगराध्यक्ष भाजपाचा झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या