Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा : सोमवारपासुन काही व्यवसाय सुरू तर काही बंद

नेवासा : सोमवारपासुन काही व्यवसाय सुरू तर काही बंद

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

शहरात सुरू असलेल्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर जनता कर्फ्युला मुदत वाढ द्यायची का, की व्यवसाय सुरू करायचे या बाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन नगरपंचायत प्रांगणात करण्यात आले होते. काही व्यवसायिकांनी शहरात लॉकडाऊन वाढवावे लागेल तर काही व्यावसायिकांनी सोमवारपासुन व्यवसाय सुरू करावे असे मत मांडले. याच चर्चेअंती सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत उघडण्याचा निर्णय झाला.

- Advertisement -

उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, रुग्णांची संख्या पाहता शहरात जनता कर्फ्युचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला होता. आज ही जनता कर्फ्युची मुदत वाढवण्याबाबत बैठकीमध्ये उपस्थित नागरिक व व्यावसायिक यांनी सोमवार पासुन व्यवसाय सुरू करावे असा निर्णय घेतला आहे.

तरी सर्व व्यावसायिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व त्याचबरोबर दुसर्‍यांची काळजी घ्यावी व शासनाचे नियम पाळून व्यवसाय करावा. याचवेळी सतीश पिंपळे म्हणाले की, आपण जो निर्णय घेत आहोत हा व्यावसायिक व नागरीकांचा आहे.

यावेळी बोलताना म्हणाले संजय सुखदान म्हणाले की, नेवासकर यांनी आप आपला व्यापार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. नियम पाळून व्यवसाय करावा. निरज नागरे म्हणाले की, नेवासा शहरातील करोना बाधितांची संख्या आजपर्यंत (140 ते 150)च्या घरात गेली असून मागील काही दिवसात काही व्यावसायिक करोना बाधित झाले आहेत. तसेच एका व्यापार्‍याला करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले याचा ही विचार करणे गरजेचे आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही व्यावसायिकांनी व्यवसाय काही दिवसांसाठी बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या