Friday, April 26, 2024
Homeनगरनेवासा बाजार समिती लवकरच व्यावसायिक गाळे बांधणार

नेवासा बाजार समिती लवकरच व्यावसायिक गाळे बांधणार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समितीच्या जागेत लवकरच व्यावसायिक गाळे बांधणार असून

- Advertisement -

गाळे बांधण्यात येणार्‍या जागेची जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी नुकतीच भेट देवून पाहणी केली.

शेतकरी बांधवांना शेतमाल स्थानिक पातळीवर चांगल्या भावाने विकता यावा, बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून रोजगार मिळावा, यासाठी बाजार समिती व्यावसायिक गाळे बांधणार आहे.

या गाळ्यांच्या जागेची जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी उपस्थित डॉ. शिवाजी शिंदे, बाळासाहेब पाटील, नामदेव लोखंडे, गणेश कोरेकर, पी. आर. जाधव, उदय पालवे, सुनील जाधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या