Friday, April 26, 2024
Homeनगरवाकडीतील बैलगाडा शर्यतीत मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

वाकडीतील बैलगाडा शर्यतीत मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील वाकडी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत संदीप कर्डिले यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नेवासा पोलिसात सात हल्लेखोरांविरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संदिप रूपचंद कर्डिले (वय 35 वर्षे) गेवराई ता नेवासा याने नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांना दिलेल्या जबाब व फिर्यदित म्हंटले आहे की, दि.१ डिसेंबर रोजी मी वाकडी येथे खंडोबाचे दर्शन घेऊन बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी गेलो व तेथे शर्यतीचा कार्यक्रम चालु असताना सांयकाळी ५.०० वाजेचे सुमारास वाकडी शिवारात दत्तात्रय काळे यांचे वस्तिजवळील पडीक शेताजवळ आसताना एका चार चाकी वाहन नंबर MH17 – 7077 ही मधुन आचानक खंडू उर्फ अशोक किसन सतरकर हा गाडीमधुन खाली उतरला व त्यांचे पाठोपाठ शरद कदम (पूर्ण नाव माहीत नाही),रामेश्वर कदम रा. खुणेगाव, हरीष शिरसाठ (पूर्ण नाव माहीत नाही), उद्धव शिरसाठ रा.म्हसले, शेखर अशोक सतरकर रा. गेवराई,बहिरनाथ शिरसाठ रा.म्हसले असे गाडीतून खाली उतरले.

त्या वेळी अशोक सतरकर हातात लोखंडी गज घेऊन माझाकडे आला व जुन्या भांडनाच्या कारणावरुन मला शिविगाळ करून मी तुला आता जीवंत सोडणार नाही असे म्हणून त्यांचे हातातील गजाने माझे डोक्यात व डोक्याचे मागील बाजुस मारून जखमी केले. तेवढ्यात शरद कदम,रामेश्वर कदम, उद्धव शिरसाठ, बहीरनाथ शिरसाठ व शेखर शिरसाठ असे हातात लोखंडी शिवळा घेऊन मला शिविगाळ करुन उजव्या हातावर, पाठिवर व शेखर सतरकर यांने त्यांच्या हातातील लोंखडी शिवळाने पोटात जोरात मारून मुक्का मार दिला आहे. त्यानंतर तेथे असणारे भारत गणगे व दत्तात्रय शिंदे यांनी येवुन सोडवा सोडव केली. त्यानंतर मला मार लागल्याने गोंविंद कर्डिले याने मला घेऊन नेवासा पोलीस स्टेशनत आणले.

जास्त मारल्याने मला दवाखान्यात जाण्याची पत्र दिले. उपचाराकामी ग्रामिण रुग्णालय नेवासा फाटा येथे गेलो तेथील डॉक्टरनी प्रथम उपचार केल्यानंतर मला पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल नगर येथे जाण्यास सांगितले. सिव्हील हॉस्पीटल येथे न जाता नगरच्या मेक केअर हॉस्पिटल मध्ये उपचार कामी दाखल झलो असून उपचार चालु आहेत.

या फिर्यदि वरुन नेवासा पोलिस ठाण्यात अशोक सतरकर, शरद कदम,रामेश्वर कदम, हरीष शिरसाठ ,उद्धव शिरसाठ, शेखर सतरकर,बहिरनाथ शिरसाठ या सात जणांविरुद्ध गु.र.न. 1104/2022 भा.द.वि.कलम 326,304 504, 506, 193, 197, 144, 145,149 प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या