Wednesday, April 24, 2024
Homeनगरतेलकुडगावात 8, सोनईत 6 तर कुकाण्यात 3 नवे करोना संक्रमित

तेलकुडगावात 8, सोनईत 6 तर कुकाण्यात 3 नवे करोना संक्रमित

नेवासा तालुक्यात बाधितांची संख्या 679 वर

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

नेवासा तालुक्यात काल शुक्रवारी एकूण 18 करोना संक्रमित आढळून आले असून त्यामुळे तालुक्यातील एकूण करोना

संक्रमितांची संख्या 679 वर गेली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

काल सर्वाधिक 8 संक्रमित तेलकुडगाव येथे आढळून आले. सोनईत 6 व्यक्ती संक्रमित आढळून आल्या. कुकाण्यातही तिघांना करोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले तर भानसहिवरे येथेही एकाला नव्याने करोना बाधा झाली. अशाप्रकारे काल नेवासा तालुक्यात एकूण 18 जण संक्रमित झाल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची आकडेवारी 679 झाली आहे.

सोनईतील संक्रमितांची संख्या 116 वर

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा कोव्हिड सेंटरमध्ये काल शुक्रवारी झालेल्या रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्टमध्ये सोनई मधील 6 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.

मागील आठवड्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे व सोनईतील 3 व्यापारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाचे पूर्ण कुटुंब बाधित झाले होते. आज सापडलेल्यांत 1 व्यक्ती व्यापारी आहे. सोनईमध्ये एकूण 116 रुग्णसंख्या झाली आहे.

सोनईत रोजच करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सोनईतील करोना कमिटी व तालुका प्रशासन फक्त कागदावरच आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे काही दिवसांपूर्वी सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस करोना बाधित झाल्याने सोनई गावात पुन्हा गर्दीवर नियंत्रण ठेवायला किंवा करोनाविषयी आवाहन करायला पोलीस यंत्रणा कमी पडत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या