नेवासा तालुक्यात 26 नवीन करोना रुग्ण

jalgaon-digital
1 Min Read

नेवासा|शहर प्रतिनिधी|Newasa

शुक्रवारी तालुक्यात नव्याने 26 करोना बाधित रुग्ण आढळले असल्याचे माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. तालुक्यातील रुग्णासंख्या 461 इतकी झाली आहे.

शुक्रवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे 198 व्यक्तींच्या रॅपिड अँन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 26 व्यक्ती करोना बाधित आढळून आले असून यात नेवासा शहर 8, सोनई 3, भेंडा बुद्रुक 3, नेवासा बुद्रुक 3, घोडेगाव 4, उस्थळ दुमाला 2 तर धामोरी, लांडेवाडी व नारायणवाडी येथील प्रत्येकी एक व्यक्ती करोना बाधित आढळून आले तर 172 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या 461 वर गेली आहे. 13 व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने 314 करोनामुक्त झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *