‘या’ तालुक्यात भरला अनोखा पोळा

jalgaon-digital
1 Min Read

नेवासा |बुद्रुक वार्ताहर| Newasa

सर्वत्र बैलपोळा (Bail Pola) उत्साहात साजरा होत असतांना नेवासा बुद्रुक (Newasa Budruk) येथे अनोख्या पद्धतीने बैल (Bail) व ट्रॅक्टरचा पोळा (Tractor Pola) भरविण्यात आला होता. बैलजोडीप्रमाणेच आज अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे करतात. ज्याप्रमाणे शेतकरी (Farmer) आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत पोळा हा सण मोठ्या थाटात साजरा करतो. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर मालकाने व नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतने देखील अनोखी शक्कल लढवीत हा बैल व ट्रॅक्टर पोळा (Bail And Tractor Pola) भरविला.

16 हजार शेतकर्‍यांचे चारा उत्पादनासाठी अर्ज

वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत गावाच्या वेशीतून यावेळी पोळ्याला सुरुवात करण्यात आली. या अनोख्या पोळ्यात गावातील शंभर पेक्षा जास्त हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे (Newasa Police Station) पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे व सरपंच प्रकाश सोनटक्के हे उपस्थित होते. आजचा आधुनिक व स्पर्धेच्या युगात शेतीची बहुतांश कामे शेतकरी ट्रॅक्टरद्वारेच करतात. त्यामुळे बैलांच्या पोळ्याप्रमाणेच ट्रॅक्टरचा पोळा पाहण्यासाठी गावकर्‍यांनी गर्दी केली होती.

बसच्या टायरने घेतला पेट पुढे झाले असे काही…‘सीएनजी’च्या खपाने स्पीड पकडला ! बँकेत खाते नसतानाही नावावर काढले दहा लाखांचे कर्ज

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *