Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा-बाभळेश्वर महामार्गावरील नवीन पूल देत आहेत अपघाताला निमंत्रण

नेवासा-बाभळेश्वर महामार्गावरील नवीन पूल देत आहेत अपघाताला निमंत्रण

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

नेवासा-बाभळेश्वर या महामार्गाचे (Newasa-Babhaleshwar Highway) काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी पूल (Bridge) बांधण्यात आले परंतु या पुलावर कठडे (Side Walls) बांधण्यात न आले आहीत. त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळेस अंदाज येत नसल्याने हे पूल अपघातास निमंत्रण ठरत आहे.

- Advertisement -

सध्या पावसाळा सुरू झाल्याने नेवासा-बाभळेश्वर महामार्गाचे (Newasa-Babhaleshwar Highway) काम बंद अवस्थेत दिसून येत आहे. पावसामुळे काम करण्यास अडथळा येत असेल तरी पुलांचे कठडे बांधण्यास कुठलीही अडचण नसावी. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) व संबंधित ठेकेदार यांच्या नाकर्त्यापणामुळे या पुलांवर एक वर्षानंतरही वाहतूक सुरळीत झाली असतानाही कठडे बांधण्यात येत नसल्याने येजा करणारे वाहन चालक जीव मुठीत धरून वाहन चालविताना दिसत आहे.

संबंधित अधिकारी व ठेकेदार मोठ्या अपघाताची वाट पाहत नसेल ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाना पडला आहे. या कठाड्यांचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास संबंधित पुलांना हार घालून गांधीगिरी स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, काम सुरू करण्यासाठी पुढील आठ दिवसांची मुदत देत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी याची नोंद घ्यावी, असा इशारा दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या