Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा : 51 ग्रामपंचायतींसाठी चौथ्या दिवशी 534 अर्ज दाखल

नेवासा : 51 ग्रामपंचायतींसाठी चौथ्या दिवशी 534 अर्ज दाखल

नेवासा –

तालुक्यातील 72 गावांच्या 59 ग्रामपंचायतींच्या 591 जागांसाठी 15 जानेवारीला होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या

- Advertisement -

कालच्या चौथ्या दिवशी 51 ग्रामपंचायतींसाठी 534 अर्ज दाखल झाले. चौथ्या दिवसअखेर एकूण 737 अर्ज दाखल झाले आहेत. 9 गावांच्या 8 ग्रामपंचायतींसाठी कालअखेर एकही अर्ज दाखल झाला नाही. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे.

काल दाखल अर्ज (कंसात चौथ्या दिवसअखेरचे एकूण अर्ज) पुढीलप्रमाणे- बाभुळखेडे 14(26), बाभुळवेढे-उस्थळदुमाला 7(7), बहिरवाडी-धामोरी ग्रुप 7(7), बकुपिंपळगाव 2(8), बर्‍हाणपूर 9(9), बेल्हेकरवाडी 15(15) बेलपिंपळगाव 14(16), भालगाव 9(ं9), भेंडे बुद्रुक 27(47), चांदा 17(26), देवगाव 5(6), देवसडे 3(9), धनगरवाडी-नारायणवाडी 4(7), दिघी 24(34), गळनिंब 17(17), घोगरगाव 7(7), गोंडेगाव-म्हसले 7(11), गोणेगाव-इमामपूर 13(19), गोयगव्हाण-पिंपरीशहाली 26(26), जळके बुद्रुक 3(17), जळके खुर्द 11(15), जेऊर 22(42), खडके 8(10), खलालपिंप्री-मडकी-मुरमे ग्रुप 5(14), खरवंडी 2(2), खेडलेपरमानंद 1(1), कुकाणा 22(28), लोहगाव 3(3), मक्तापूर 16(21), माळेवाडी दुमाला-सुरेगाव तर्फे दहिगाव-वरखेड 19(19), माळेवाडी खालसा-म्हाळापूर-प्रवरासंगम ग्रुप 19(40), मांडेगव्हाण-मोरगव्हाण ग्रुप 1(1), मंगळापूर 7(7), म्हाळसपिंपळगाव 2(3), मोरयाचिंचोरे 9(9), नजिकचिंचोली 10(10) नवीन चांदगाव 2(2), निंभारी 2(2), निपानीनिमगाव 13(13), पाचुंदे 7(7), रांजणगाव 2(2), सलाबतपूर 3(12), शिंगवेतुकाई 9(21), सोनई 32(38), सुलतानपूर 9(9), तरवडी 12(14), तेलकुडगाव 8(18), टोका-वाशिम 9(10), उस्थळ खालसा 2(2), वाकडी 16(28), वाटापूर 3(7).

- Advertisment -

ताज्या बातम्या