Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedकृतियुक्त संकल्प

कृतियुक्त संकल्प

– मोहनदास भामरे

र्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुरु झालं की, अनेक संकल्प कावळ्याच्या छत्रींसारखे ऊगवतात. ते दृढ वगैरे गोंडस नावाने भिष्म प्रतिज्ञेच्या थाटात सांगीतले जातात. पण दुसर्‍या तिसर्‍या दिवसापासुन, टम्म फुगलेला फुगा जसा गलीतगात्र होत जातो तसं या संकल्पांचं होतं. मग ये रे माझ्या मागल्या सुरु होतं. म्हणून या संकल्पांनाच कृतीयुक्त व दृढ करण्याचा संकल्प आता करु या, सध्या प्रखरतेने भेडसावणारा प्रश्न म्हणजे पर्यावरण.. स्वच्छता, रोगराई हा आहे.

- Advertisement -

चला या बाबतच आज संकल्प करु या. 2022 ला स्वच्छ सुंदर, रोगमुक्त अशी वसुंधरा करु या, त्यासाठी माझ्या या छोट्या छोट्या कथा.. ही जन जागृती व मन जागृती आहे.

॥ माझीही स्वच्छता

तुझीही स्वच्छता॥

मंडळी, काल मी एका माणसाला त्याच्या दुकाना समोरचे अंगण झाडतांना पाहीले. ला खुप बरे वाटले, अरे व्वा, फारच स्वच्छता करतोय हा दुकानदार, म्हणून मला आनंद झाला. पण तो क्षणातच विरला हो.

कारण.. त्याने त्याचे अंगण साफ करुन तो कचरा बाजुच्याच्या अंगणात सरकवुन दिला, नि झाडु ठेवुन दुकानात गेला. थोड्या वेळाने बाजुच्याने ही तसेच केले.

आपला कचरा दूसरीकडे वळवला, ही ऊसनवारी न चुकता आपण करतो. याच्याने खरच स्वच्छता होईल? हो होईलच! फक्त स्वतःची, पण दुसर्‍याचे काय? आपण आपली घाण बाजुच्याकडे टाकुन काय साध्य केलं? फक्त तो कचरा शिप्ट केला, आपल्या अंगणातुन दुसर्याच्या अंगणात, एवढच समाधान, तर मंडळी, अशा समाधानाने खरच आपले गाव स्वच्छ होईल का? म्हणून आम्ही मोहीम राबवु या, मी कचरा कुंडीत कचरा टाकणार.दुसर्याच्या अंगणात नाही. जसे माझे अंगण स्वच्छ., तसे बाजुचेही स्वच्छ,, सर्वांनी हा निर्धार केला तर अवघा परीसर स्वच्छ राहील. अशी शिप्टींग न करता माझी ही स्वच्छता.. तुझीहि स्वच्छता,. आधी मी,मग तुम्ही बरं का मित्रांनो, चॅरीटी बिगीन्स एट होम कुठलीही सेवा आपल्या घरापासुन सुरु करावी, पण आताशा आपण स्वतः न करता नेहमी दूसर्यांकडुनच अपेक्षा करतो, दुसरा करेल तर मग मी करेल. दुसराही तसाच विचार करतो मग कुठलेच काम होत नाही.

खरं सांगतो, माणूस फक्त स्वतःवर प्रेम करतो, त्यानंतर दुसर्‍यावर, कोणताही फायदा आधी माझा झाला पाहीजे. कुठेही आधी माझा नंबर पहीला पाहीजे, फोटो मध्ये मीच पुढे दिसला पाहीजे, ही सर्व साधारण हरएक माणसाची धारणा असते, ती नैसर्गिक आहे,असे समजु या..

मग जसे आपण स्वार्थाच्या वेळी पुढे असतो, तसं सेवेच्या, चांगल्या कामाच्या वेळी पुढे असतो का? जसं हक्काच्या वेळी आपण पुढे असतो, तसे कर्तव्याच्या बाबतीत असतो का? असा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा व प्रामाणिक ऊत्तर शोधावे.

आता स्वच्छता आधी मी करेन, मी परीसर स्वच्छ ठेवेन, नियमांचे पालन मी करेन, प्लॅस्तीक बंदी मी करेन, वृक्षारोपन मी करेन, पाणी अडवा पाणी जिरवा मी करेन. आधी मी आदर्श नागरीक होईन.

मग… मी दूसर्‍यांना सांगेन, आधी मी सुरुवात केली तर माझे कुटुंब करेल,, मग माझी गल्ली करेल,, मग वार्ड करेल आणि बघता बघता अवघे शहर करेल, आपण दुसर्यांकडे बोट दाखवणे पेक्षा आपल्या पासुनच सुरुवात करु या,

एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ

तसे हे आहे. चला तर मग आज संकल्प करु या, स्वच्छतेचा, वृक्षारोपनचा पर्यावरण सुरक्षेचा आधी मी मग तुम्ही.

।बाराजणनी माय नि खाटले जीव जाय।

एक म्हातारी माय आजारी पडली.तिचे मुले नातवंडे असे बारा जण होते. एकाला वाटले दुसरा दवाखान्यात नेईल, दुसर्‍याला वाटले तिसरा नेईल. असे सर्व जण एकमेकांच्या भरवशावर राहीले.

कुणीच त्या मायला दवाखान्यात नेले नाही.शेवटी ती खाटल्यावरच मेली, त्या दिवसापासुन ही म्हण प्रचलीत झाली, स्वच्छतेचे ही तसेच आहे.

आपल्याला वाटते तो करेल,त्याला वाटते हा करेल अशा भरवशावर कुणीच सार्वजनिक स्वच्छता करत नाही. म्हणून कचरा जसाच्या तसा राहतो. अस्वच्छता तशीच राहते. सार्वजनिक आरोग्य खराब होते.

हे न करता आपणच स्वच्छतेला सुरुवात करावी. दुसर्‍याच्या भरवशावर राहु नये हेच ऊत्तम. घरात, अंगणात, चौकात, वार्डात, गल्लीत, कार्यालयात, शाळेत, जेथे जेथे अस्वच्छता जाणवेल तेथे तेथे आपण लगेच जागृतपणे या कामी कामाला लागावे. वेळीच संबंधितांना कळवुन स्वच्छता करुन घेणे महत्वाचे आहे. नाही तर बस्स बारा जणनी माय नि खाटले जीव जाय.

। एक सांस की किमत

तुम क्या जानोगे बाबु?।

मंडळी, कोवीड चा तो भयानक काळ आठवला तरी अंगावर शहारे येतात. जीवन मरणाचा तो जीवघेणा संघर्ष आम्हा मानवांना खुप काही शिकवुन गेला. त्या पासुन जर आपण धडा घेतला नाही, तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच..

एका श्वासासाठी तरमळणारे,तरसणारे,तडफडणारे जीव मनाला छिन्न विच्छीन्न करत होते. प्राणवायुच्या एका सिलेंडर साठी चाललेली धडपड व धावपळ आम्ही पाहीली.कितीही किंमत मोजली तरी ते मिळत नव्हते. तेंव्हा प्राणवायुचे (ऑक्सीजन) महत्व कळते.

निसर्ग आपल्याला मोफत मोफत चक्क मोफत तो आपल्याला देतो. मोफत असल्याने आपल्याला त्याचे महत्व कळत नाही. माझी वसुंधरा अभियानात आपण जे वृक्षारोपन सांगतो ते याच्याचसाठी. झाडे प्राणवायु देतात.जेवढी जास्त झाडे तेवढा प्राणवायु जास्त.

म्हणून वृक्षारोपन करु या, जेथे जागा मिळेल तेथे झाडे लावू या. पण मंडळी, आपण झाडे लावली, आपले टारगेट गाठले, पेपरात फोटो आले, म्हणजे संपले असे होता कामा नये बरं का., त्या रोपांचे संगोपन करा.खतपाणी घाला, कुंपन घाला ती किती वाढली, किती जगली हे महत्वाचे आहे. आज आपण झाडे जगवले तर ते उद्या आपल्याला जगवतील. प्राणवायु देतील.

मग आपल्याला प्राण वायु साठी तरमळावे लागणार नाही. एक सांस की किंमत तुम क्या जानोगे बाबु? जब हम पेड लगाएंगे तो हमे ये सवाल ही नही रहेगा.

चला झाडे लावु या झाडे जगवु या.

– माे. 98505 15422

- Advertisment -

ताज्या बातम्या