Wednesday, April 24, 2024
Homeनगरनव्या सॉफ्टवेअरमुळे पतसंस्थांची वसुली फेसलेस होणार- आहेर

नव्या सॉफ्टवेअरमुळे पतसंस्थांची वसुली फेसलेस होणार- आहेर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पतसंस्थांची थकबाकी वसुलीची समस्या सुटसुटीत होऊन 101 चे दाखले त्वरित मिळणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मात्र अनेक कारणांनी दाखले मिळण्यास विलंब होत असतो. ही समस्या सोडवण्यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांनी ‘101 कारवाई’ हे नवे सॉफ्टवेअर स्वीकारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त पतसंस्थांनी हे सॉफ्टवेअर घेऊन उपयोग सुरू करावा. ‘101 कारवाई’ या सॉफ्टवेअरमुळे राज्यातील पतसंस्थांची वसुली 1 मे पासून फेसलेस होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

जिल्हा उपनिबंधक कार्यालय व राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित बैठकीत सहकरी पतसंस्थांची 101 चे दाखले वेगाने सादर होण्यासाठी मीडियाकॉन इंडिया या कंपनीने तयार केलेले ‘101 कारवाई’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देण्यासाठी सर्व तालुका उपनिबंधकांच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन नगरमध्ये करण्यात आले होते.

या बैठकीत ‘101 कारवाई’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देण्यात आली. उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सुरेखा लवांडे, सॉफ्टवेअरचे निर्माते विनीत डावरे आदींसह सर्व तालुक्यांचे उपनिबंधक उपस्थित होते.

यावेळी काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांची कर्ज थकबाकी वेगाने व्हावी यासाठी 101 चे दाखले त्वरित मिळावेत ही मागणी राज्य पतसंस्था फेडरेशन कित्येक वर्षांपासून सहकार विभागाकडे करत आहे. आता डिजिटल व ऑनलाईन तंत्रज्ञानाचा काळ आला आहे. म्हणूनच राज्य पतसंस्था फेडरेशन व मिडियाकॉन इंडिया या कंपनी यांनी संयुक्तपणे तयार केलेले ‘101 कारवाई’ हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर मुळे 101 ची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने गतिमान होणार आहे.

तालुका उपनिबंधक स्वतः हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष वापरणार असल्याने यात काय काय सुधारणा होणे आवश्यक आहे याबाबतच्या महत्वपूर्ण सूचना सर्वांनी कराव्यात. त्याच बरोबर जिल्ह्यातील जास्तीतजास्त पतसंस्थांनीही या सॉफ्टवेअरचा वापर सरू करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या