Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनवीन नाशिक पुन्हा बनला करोनाचा हॉट स्पॉट

नवीन नाशिक पुन्हा बनला करोनाचा हॉट स्पॉट

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचा प्रकोप सुरू असुन मागील वर्षात पंचवटी विभाग करोनाचा हॉटस्पॉट बनलेला असतांना आता नवीन वर्षात महापालिका क्षेत्रात नवीन नाशिक विभाग हॉटस्पॉट बनला आहे. याठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने रुग्ण वाढत आहेत. आजमितीच 6 हजारावर अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. यामुळे करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातील सहा विभागात काल (दि.4)पर्यत 17 हजार 472 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असुन यातील बहुतांशी रुग्ण हे घरात उपचार घेत आहेत. घरी राहुन उपचार घेत असलेल्या रुग्णांकडुन शासनाच्या नियमांचे पालन केले जात नसुन त्यांच्या बाहेर फिरण्यामुळे व त्यांच्या संपर्कामुळे कुटुंब नातेवाईक व मित्रमंडळींना करोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. वाढत असलेल्या रुग्णांत सर्वात भरणा हा नवीन नाशिक विभागातील आहे.

शहरातील 17 हजारावरील एकुण रुग्णांपैकी 6 हजार 97 रुग्ण हे नवीन नाशिक भागातील आहे. या भागात असलेल्या अरुंद गल्ल्या, अरुंद रस्ते, रस्त्यावरील दुकानामुळे व वाहनांमुळे रस्त्यावर होणारी गर्दी यातून करोना संसर्ग वेगात सुरू आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्यांकडुन नियम पाळले जात नसुन याचा परिणाम समोर आला आहे.

पंचवटी विभाग करोना संसर्गात दुसर्‍या क्रमांकावर गेला आहे. मागील वर्षात पंचवटी विभगाातील मार्केट यार्ड, फुलेनगर व परिसरातील झोपडपट्टी परिसर या भागात आणि कोणार्कनगर आडगांव शिवार याठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना बाधित आढळून आले होते. पंचवटी विभाग एक क्रमांकावरुन दोन क्रमांकावर आला आहे. पंचवटीत 4 हजार 575 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.

नवीन नाशिक मध्ये वाढत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नगरसेवकांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. याची दखल घेत प्रशासनाकडुन छत्रपती संभाजी स्टेडीयम व ठक्कर डोम याठिकाणी आता कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. या मुळे नवीन नाशिक येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या