Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजगण्याचे नवे तंत्र : कार्यालयात काम करतांना

जगण्याचे नवे तंत्र : कार्यालयात काम करतांना

अनेकांनी कार्यालयात जाऊन काम करायला सुरुवात केली आहे. काम तर करायलाच हवे. तथापि ते करताना करोना विषाणू आणि तो कसा पसरतो हे सर्वानी समजून घ्यायला हवे.

एकदा ते समजले की आपण आपोआप जागरूकपणे वावरायला लागू. उदाहरणार्थ कार्यालयाचा जिना चढतांना माणसे सहज कठड्याला हात लावतात.

- Advertisement -

एखादी व्यक्ती सहकार्‍यांकडून पेन घेते. तो वापरते. कळत-नकळत तोच हात चेहर्‍याला लावते. आतापर्यंत हे सहजपणे घडत होते. पण आपल्याला आता असे करता येणार नाही.

आठवणीने वारंवार हात धुणे, कार्यालयातील वस्तुंना विनाकारण हात न लावणे, कोंडाळे करून गप्पा मारणे, बाहेरचे न खाणे, बाहेरून घरी आल्यावर लगेच हातपाय धुणे या सवयी रुजवाव्या लागतील.

आपल्यामुळे आपल्या घरातील लहान मुले आणि आपले पालक यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये याचीही जाणीव आपल्याला सतत ठेवावी लागेल. निरोगी जीवनपद्धती स्वीकारणे सर्वांच्याच हिताचे आहे.

– प्रतीक दौलत, आर्किटेक्ट

- Advertisment -

ताज्या बातम्या