Friday, April 26, 2024
Homeनाशिकजगण्याचे नवे तंत्र : किराणा सामान घरी आणतांना

जगण्याचे नवे तंत्र : किराणा सामान घरी आणतांना

सध्याच्या वातावरणात किराणा आणताना प्रत्येकाने सुरक्षित अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे या प्राथमिक गोष्टी पाळणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त आपण जेव्हा किराणा माल घरात आणतो त्यावेळी लगेच तो वापरायला घेणे चुकीचे आहे. किराणा माल खाद्यपदार्थ असल्याने त्यांना आपण सॅनेटाईज करू शकत नाही.

- Advertisement -

त्यामुळे काही काळासाठी किराणा मालाची पिशवी कोणालाही स्पर्श करू न देता एका बाजूला ठेवून द्यावी. थोड्या कालावधीनंतर मग साहित्य बाहेर काढून वापरायला घ्यावे.

शक्यतो आपल्या नेहमीच्या दुकानदारांना घरपोच धान्य किराणा पोहोचवण्याची मागणी करावी. त्यामुळे बाजारात जाणे-येणे टाळले जाऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.

-प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, धान्य व किराणा व्यापारी असोसिएशन

- Advertisment -

ताज्या बातम्या