Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजगण्याचे नवे तंत्र : पाळीव प्राणी आणि आपण 

जगण्याचे नवे तंत्र : पाळीव प्राणी आणि आपण 

अनेकांनी कुत्रे पाळलेले असते. त्याला सकाळ-संध्याकाळ फिरायला न्यावे लागते. सध्याच्या या काळात त्याची आणि आपली काळजी घ्यायला हवी.

कुत्र्याला फिरवून आणल्यावर त्याचेही पाय, किमान पायाचे पंजे सॅनिटायझरने धुवावेत. त्याला सॅनिटायझरची अ‍ॅलर्जी येऊ शकते. पायाला खाज सुटू शकते. पुरळ उठू शकते. तसे लक्षात आले तर त्याचा वापर बंद करून डेटॉलच्या पाण्याने पाय धुवावेत.

- Advertisement -

नंतर पाय कोरडे करावेत. कुत्र्याचे पाय धुण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड मात्र वापरू नये. कुत्र्याला बाहेर फिरायला नेल्यानंतर त्याचे केस विंचरावे. म्हणजे त्याच्या केसावरील अनावश्यक केस आणि धूळ निघून जाईल. त्यानंतर आपले हात आणि पाय साबण लावून स्वच्छ धुवावेत.

डॉ. सचिन वेन्दे, पशुधन विकास अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या